Mumbai:'शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही' खचलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाने सोडला प्राण Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai:'शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही' खचलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबाने सोडला प्राण

अखेरपर्यंत न्याय मिळाला, नसल्याची खंत व्यक्त करत एका स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीने आपल्या २ मुलांसह आत्महत्या केली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई : राहत्या घरावर एका परिचयाच्या व्यक्तीसोबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यामध्ये अखेरपर्यंत न्याय मिळाला, नसल्याची खंत व्यक्त करत एका स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीने आपल्या २ मुलांसह आत्महत्या केली आहे. आत्महत्येअगोदर लिहिलेल्या चिठ्ठीतून संबंधित महिलेने न्याय व्यवस्थेसह अन्य महत्त्वाच्या यंत्रणा आणि व्यक्तींवर नाराजी व्यक्त केले आहे. कायदेशीर लढ्यात शेवटपर्यंत न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. शनिवारी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीने आपल्या २ मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस येताच मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

मोहिनी कामवायनी असे आत्महत्या करणाऱ्या ८७ वर्षीय महिलेचे नाव असून, त्या स्वातंत्र्यसैनिक नारायणदास कामवायनी यांच्या पत्नी आहेत. मोहिनी यांनी शनिवारी आपला मुलगा दिलीप (वय-६७) आणि दिव्यांग मुलगी कांता (वय-६५) यांच्यासह आत्महत्या केली आहे. मृत मोहिनी ह्या वाशी या ठिकाणी सेक्टर ४ मध्ये आपल्या २ मुलांसह वास्तव्याला होते. त्यांच्या परिचयाच्या एका व्यक्तीने त्यांचे घर बळकावण्याचा प्रयत्न करत होता.

यामुळे त्याच्या राहत्या घरावरून परिचयाच्या व्यक्तीबरोबर न्यायालयीन वाद सुरू होता. दरम्यान उच्च न्यायालयाने तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करत, आरोपीने नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला होता. पण नुकसान भरपाई ऐवजी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोहिनी यांनी केली होती. याकरिता २०१२ साली मोहिनी उपोषणाला बसले होते.

तसेच राष्ट्रपतींना पत्र पाठवून न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. पण २०१६ नंतर हे प्रकरण लांबतच गेले. शेवटपर्यंत लढा देऊन देखील अपेक्षेप्रमाणे न्याय मिळत नसल्यामुळे त्या खूप खचून गेले होते. अखेर शनिवारी रात्री मोहिनी यांनी आपल्या दोन्ही मुलांसह विष प्राशन करून आपल्या जीवनाचा शेवट केला आहे.

मोहिनी यांनी आत्महत्येअगोदर लिहिलेल्या चिठ्ठीत न्यायव्यवस्थेसह अन्य यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित जुन्या प्रकरणात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Crisis: धुळ्यात SRPF जवानाला बेदम मराहाण, गॅस एजन्सीबाहेर नागरिकांचा तुफान राडा; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक पेट घेतला

Summer Season Saree Designs: उन्हाळ्यात कोणती साडी नेसावी? हे 5 पॅटर्न ट्रेडिंगमध्ये

Saree Reuse Dress: लग्नसराई ते डेली वेअर, कपाटातल्या जुन्या साड्यांपासून शिवता येतील ७ नवे ट्रेंडी ड्रेस

LPG Gas Cylinder: कॉल करुन सिलेंडर बुक होत नाही? आत्ताच फॉलो करा या ४ स्टेप्स; बुकिंग करूनही न मिळाल्यास 'इथे' करा तक्रार

SCROLL FOR NEXT