Sharad Pawar Junnar Visit News:  Saamtv
मुंबई/पुणे

Atul Benke News: 'अजित पवारांचा शिलेदार शरद पवारांच्या विचाराने चालणार', जाहीर सभेत दिला शब्द; अतुल बेनकेंच्या भाषणाची चर्चा

Sharad Pawar Junnar Visit News: कार्यक्रमाला अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके, खासदार अमोल कोल्हे आदी नेते हजर होते. यावेळी बोलताना अतुल बेनके यांनी शरद पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले.

रोहिदास गाडगेखेड

जुन्नर, ता. २५ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत. जुन्नरमध्ये मा.आमदार स्व.श्रीकृष्ण रामजी तांबे, मा.आमदार स्व लतानानी श्रीकृष्ण तांबे आणि शिक्षण महर्षी स्व.विलासराव तांबे सर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व चैतन्य विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उ‌दघाटन शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके, खासदार अमोल कोल्हे आदी नेते हजर होते. यावेळी बोलताना अतुल बेनके यांनी शरद पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले.

काय म्हणाले अतुल बेनके?

"आज आदरणीय शरद पवार साहेब कार्यक्रमाला आले. संपूर्ण कुटुंबांने त्यांची भेट घेतली. या भेटीवेळी साहेबांनी शैक्षणिक संस्था, विकामाबद्दल सर्व विचारपूस केली. साहेबांना पुतळ्याचे अनावरण होत असल्याचे माहित होताच ते स्वत: हून इथे आले. साहेब इथ येत आहेत समजताच आनंद झाला, असे अतुल बेनके म्हणाले. तसेच शरद पवारांचे कौतुक करत त्यांचे विचार सोडणार नाही," असा शब्दही अतुल बेनके यांनी दिला.

अमोल कोल्हेंची फटकेबाजी

"५४ वर्षांपूर्वी या भागाचे नेतृत्व करणाऱ्याचा गौरव आज आपण करत आहोत. त्यांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करत आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. आता ही तत्व ही निष्ठा आजच्या काळात राहिली का हा फार मोठा प्रश्न सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघितलं तर नक्कीच निर्माण होतो," असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनीही जोरदार फटकेबाजीही केली.

जनतेने जागे झाले पाहिजे!

"आमदार अतुल बेनके यांनी बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख पण त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शासन करते काय हा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. दहा दिवसात 12 घटना घडतात आणि या बारा घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असताना काही शासनाच्या योजनांची जाहिरात करण्यामध्ये लोकप्रतिनिधी हे मजबूत राहत असतील तर अशा लोकप्रतिनिधी ना जागा दाखवण्यासाठी जनतेने जागे झाले पाहिजे?" असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

SCROLL FOR NEXT