sanjay raut, sujit patkar saam tv
मुंबई/पुणे

Jambo Covid Center Scam Case: जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरण, संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांच्या अडचणी वाढणार

Sujit Patkar Case: सुजित पाटकर यांनी निधी हस्तांतरासंदर्भातील माहिती EOW समोर उघड न केल्याचा कोर्टाचा निष्कर्ष आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

Sujit Patkar Case Update: मुंबईतील कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात (Jambo Covid Center Scam Case) उद्योजक आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. गुरुवारीच कोर्टाने EOW च्या गुन्ह्यात सुजित पाटकर (Sujit Patkar) यांचा जामीन फेटाळला होता. अशामध्ये सुजित पाटकर यांनी निधी हस्तांतरासंदर्भातील माहिती EOW समोर उघड न केल्याचा कोर्टाचा निष्कर्ष आहे.

लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस व्यतिरिक्त अन्य लोकांना हस्तांतरित केलेल्या निधीची माहिती पाटकर यांनी उघड केली नसल्याचे कोर्टाने सांगितले. गुन्ह्यातील आरोपी पाटकर यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी कोठडीत चौकशी होणे गरजेचे देखील कोर्टाचे म्हणणे आहे. तसंच सविस्तर आदेशात कोर्टाने सुजित पाटकरांच्या जामीन फेटाळण्याची कारणं नमूद केली आहेत.

जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. बनावट कागदपत्रे देऊन जम्बो कोविड सेंटरसाठी कंत्राट मिळवणे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अधिक दाखवून पैसे लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाकडे केला होता. पण सुजित पाटकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असल्याने गुन्ह्यातील जामीन फेटाळण्यात आला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी जम्बो केअर सेंटर घोटाळ्याविरोधात आवाज उठवला होता. सोमय्या यांनी ट्वीट करत संजय राऊत यांचे पाटनर सुजित पाटकर यांनी कोविड काळामध्ये किती कमाई केली त्याचा जवाब द्या, असं म्हटलं होतं. बोगस बिलांविरुद्ध 2.32 कोटी भरले. ते पैसे कुठे गेले? लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने बेनामी खात्यात 14 कोटी हस्तांतरित केले त्याचे पैसे कुठे गेले? असा सवाल सोमय्या यांनी या ट्वीटमध्ये केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT