Thane News Saam tv
मुंबई/पुणे

Thane News: एवढं कुठं मारतात का? NCC च्या विद्यार्थ्यांना भरपावसात काठीने फोडून काढलं; जोशी बेडेकर कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयातील NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thane News: ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयातील NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

जोशी बेडेकर महाविद्यालयात नेमकं झालं?

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे NCC चे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येत असतात. मात्र ही शिक्षा अशा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजली आहे.

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसी नकोच असे म्हणताना दिसतायत. मात्र या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचं जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितलं आहे.

प्राचार्या सुचित्रा नाईक नेमक्या काय म्हणाल्या?

या प्रकरणावर प्राचार्या सुचित्रा नाईक म्हणाल्या, 'एनसीसीचे हेड जे असे असतात ते सिनियर विद्यार्थीच असतात, ते कोणी शिक्षक नसतात. मात्र हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार झाला आहे. याने एनसीसीच्या मार्फत जी चांगली काम होतात, ती झाकोळली गेली आहेत. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार आहे'.

प्राचार्या सुचित्रा नाईक पुढे म्हणाल्या, 'या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही तत्काळ करत आहोत. ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील, त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. आम्हाला येऊन भेटावे एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये, असेही नाईक यांनी सांगितल आहे.

व्हिडिओत नेमकं काय दिसत आहे?

सिनियर कॅडेट कॅप्टनने NCC च्या विद्यार्थ्यांना भरपावसात काठीने फोडून काढल्याचा धक्कादायक प्रकार दिसत आहे. ठाण्यातील जोशी -बेडेकर कॉलेजमधील हा प्रकार आहे. या विद्यार्थ्यांना घाणेरडे पाणी आणि चिखलात ओणवं उभं राहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर या विद्यार्थ्यांना काठीने फोडून काढलं. कॉलेजच्या शेजारील एका इमारतीमधील एका महिलेने हा प्रकार कॅमेरात कैद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT