जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा; मुलगी सासरी जाताना आव्हाड भावुक रश्मी पुराणिक
मुंबई/पुणे

जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा; मुलगी सासरी जाताना आव्हाड भावुक

ना बँडबाजा, ना वरात अगदी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कन्येचा विवाह सोहळा आज पार पडला आहे. त्यांची कन्या नताशा (Natasha Awhad) यांचा विवाह आज रजिस्टर्ड पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्या "नाद" या घरी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नताशा यांचा विवाह अॅलन पटेल यांच्या समवेत झाल्यानंतर मुलीचे वडील म्हणून मंत्री जितेंद्र आव्हाड अत्यंत भावुक झाले. मुलीच्या सांगण्याप्रमाणे सध्या पद्धतीने विवाह केल्याचे आव्हाड यांनी सांगितलं आहे.

तर एकीकडे, अनेक नेते आपल्या मुला-मुलींचे लग्न फार थाटामाटात लावत असतात. लग्नात मोट्ठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. मात्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाजासमोर आदर्श ठेवतं अत्यंत सध्या पद्धतीने आणि आपल्या मुलीच्या म्हणन्यानुसार लग्न लावून दिले आहे. रजिस्टर पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. तसेच या लग्नात आलेले पाहुणे देखील मोजकेच उपस्थित होते.

नताशा आव्हाडचा विवाहसोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला आहे. ना बँडबाजा, ना वरात अगदी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श मोठा ठेवला आहे.

मुलीच्या विवाहसोहळा झाल्यानंतर बोलत असताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे पहायला मिळाले. ते म्हणाले, "मुलगी सासरी जाणार आहे, आपल्या घरी नसणार आहे. 25 वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आता आपल्या घरात नसणार आहे, ही भावना खूप वेदनादायी आहे,” एका बापाने अशावेळी काय बोलायचं? असं सांगताना त्यांना अश्रू अनावर होत होते.

अत्यंत भावुक होत जितेंद्र आव्हाड यावेळी बोलत होते, “ उद्यापासून ती घरात नसणार आहे. कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार. घरातील घरपण गेल्यासारखं असेल,” हे अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

तसेच मुलीच्या आवडीप्रमाणे सध्या पद्धतीने लग्न केलं, तिने जस सांगितलं मी तश्या पद्धतीने लग्न लावून दिलं असे देखील आव्हाड यावेळी म्हणाले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT