लक्ष्मण सोळुंके
जालना : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळेपर्यंत निवडणूक स्थगित करून ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर निवडणुका घ्यावा यामुळे कुणावर अन्याय होणार नाही. अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. ते जालन्यातील बदनापूरमध्ये बोलत होते.ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मी आदर करतो. मात्र ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक स्थगित करावी त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घ्यावा. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे टोपे यांनी सांगितलं आहे. न्यायिक पद्धतीने निवडणूका व्हाव्या असंही टोपे म्हणाले.
हे देखील पहा-
ओमिक्रॉनची (Omicron Variant) राज्यातील संख्या 10 झाली असून राज्यात आता काँटॅक्ट, ट्रेसिंग वाढवावी लागेल. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या लोकांच्या संपर्कातील लोकांच्या RTPCR चाचणी घेण्याचे काम सुरू असूनलसीकरण वाढवावं लागेल. सध्या निर्बंध लावण्याची गरज नसून परिस्थिती पाहून त्यावर निर्णय होईल असंही टोपे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. 21 डिसेंबरला होणार्या 105 नगरपंचायतींमधील ओबीसी प्रभागातील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. तसेच 21 डिसेंबरला होणार्या भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणार्या 15 पंचायत समितीतील ओबीसी जागांवरील निवडणुकीलाही स्थगिती देण्यात आली आहे. ओबीसी जागा वगळता इतर जागांवर निवडणूक होणार आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.