jitendra awhad, ncp saam tv
मुंबई/पुणे

Jitendra Awhad Resign : शरद पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद; जितेंद्र आव्हाड यांचाही राजीनामा

Jitendra Awhad Resign : शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहेत.

विलास काटे

Jitendra Awhad Resign: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागेल आहे. राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच नेत्यांना शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहेत.

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. लोकांना मनातील निर्णय घ्यावं, अशी विनंती जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. (Latest Marathi News)

लोकांची जी इच्छा पूर्ण करावी

पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा. लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी. साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा, आम्हीही आग्रही आणि ठाम आहोत. ठाण्यातील सर्व राजीनामे पाठवत आहेत, मी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. लोकशाहीचा आदर करत त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

शरद पवारांच्या छत्र छायेखाली मी ४० वर्ष आहे. म्हणून मला कोणी शिकवू नये. मी माझा मुद्दा मांडला आहे, मी थांबणार नाही. आजच्या परिस्थितीत शरद पवार राजकारणातील केंद्रबिंदू आहेत. शेवटी शरद पवार जे म्हणतील ते आमच्यासाठी अंतिम असेल. तरी असा निर्णय आम्हाला मान्य नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

ठाण्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

जितेंद्र आव्हाडांसह ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राजीनामा पाठवला जाणार आहे.

अमरावती राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संगीता ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांना देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT