Jitendra Awhad On Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

NCP News : बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही; अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर आव्हाडांचा हल्लाबोल

Jitendra Awhad On Ajit Pawar : बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही', असं म्हणत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.

Satish Kengar

Jitendra Awhad On Ajit Pawar :

'बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही', असं म्हणत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे.

याआधी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, "पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी त्यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले. नंतर काही लोकांना सांगितले की, वाय बी सेंट्रलला लोक पाहिजेत. राजीनामा देतो म्हणून सांगता मग हे कशाला? तिथे आव्हाड यांना सोडले तर इतर आमदार नव्हता, तेच तेच लोक होते. त्यानंतर आम्ही 2 जुलै रोजी शपथ घेतली." यावरच निशाणा साधत आव्हाड असं म्हणाले, असं बोललं जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आव्हाड म्हणाले, ''अजित पावरांनी शरद पवार यांच्यावर बोलाव हे कलयुग आहे. बोलतांना मर्यादा बाळगा. ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावर बोलता, तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवार आहे, हे अख्ख्या जगाला माहित. शरद पवार यांचा राजीनामा तुम्हाला हवा का होता? यांना हा पक्ष दावणीला लावायचा होता. दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता. शरद पवार त्यांना अडसर ठरत होते.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत. ते जर बारामतीतुन निवडणूक लढवत असतील तर यात गाजावाजा करण्याची गरज काय? तुमचं प्लॅनिंग कधीपासून होतं, हे स्वतः विचार करा, 5 वर्ष पवार साहेबांचं डोकं कोणी खाल्लं, भाजप सोबत चला हे कोण-कोण सांगायचं? याच चिंतन करा. शरद पवार यांचा राजकीय प्रवास धुळीत मिळवून आपण सत्तेत यायचं, हे यांना हवं होतं.''

'बस करा हे बालिश राजकारण'

ते पुढे म्हणाले, ''मी कोणाशी चर्चा केली नाही, बैठका घेतल्ल्या नाही, ना कोणाला भेटलो. आंदोलन करायला मला कोणाची परवानगी लागत नाही. तुम्ही शरद पवार यांना घाबरवायला जाता, बस करा हे बालिश राजकारण. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही. काकाच्या पाठीत सुरा कोणी भोसकला, स्वतः च्या ताईला त्रास दिला ( धनंजय मुंडे ).''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT