Ajit Pawar: निर्णय आवडला नाही तर बोलावलं कशाला? शरद पवारांना थेट सवाल, अजित पवारांचे मोठे गौप्यस्फोट; म्हणाले..

Ajit Pawar On Sharad Pawar: "राजीनामा देतो म्हणून सांगता मग हे कशाला? तिथे आव्हाड यांना सोडले तर इतर आमदार नव्हता, तेच तेच लोक होते. त्यानंतर आम्ही २ जुलै ला शपथ घेतली.." असा खुलासा अजित पवार यांनी केला.
Ajit Pawar Sharad Pawar News
Ajit Pawar Sharad Pawar News SAAM TV
Published On

रुपाली बडवे, प्रतिनिधी|ता. १ डिसेंबर २०२३

Ajit Pawar News:

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा कर्जतमध्ये सुरू आहे. या दोन दिवसीय शिबिरातून पक्षाची पुढील, वाटचाल, ध्येयधोरणे ठरवतानाच आगामी काळात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणामधून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्यावेळचा प्रसंग सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले अजित पवार?

"आम्ही १०-१२ जण देवगिरीवर बसलो होतो. भाजपसोबत जाण्याबाबत थेट साहेबांना सांगितलं तर काय होईल. या विचाराने मी ताईंना बोलवलं आणि सांगितले. ताईंनी वेळ मागितला आणि आम्ही देखील थांबलो. त्यानंतर मला घरी बोलवल, आणि अध्यक्षपदाचा राजीनाम देतो. असे शरद पवार साहेबांनी सांगितले. आम्हाला घरातल्या ४ लोकांना हे माहित होते," असे अजित पवार म्हणाले.

"त्या दिवशी पुस्तक प्रकाशनात त्यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले. नंतर काही लोकांना सांगितले की वाय बी सेंट्रलला लोक पाहिजेत. राजीनामा देतो म्हणून सांगता मग हे कशाला? तिथे आव्हाड यांना सोडले तर इतर आमदार नव्हता, तेच तेच लोक होते. त्यानंतर आम्ही २ जुलै ला शपथ घेतली.." असा खुलासा अजित पवार यांनी केला.

Ajit Pawar Sharad Pawar News
Ajit Pawar News: 'दिलेला शब्द पाळला पाहिजे...' अजित पवारांचा जयंत पाटलांवर निशाणा; नेमकं काय म्हणाले?

तसेच "२ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नाही तर १५ जुलैला बोलवलं कशाला? आधी मंत्री या मग आमदार या असे सांगितले. निर्णय आवडला नाही तर बोलावले कशाला? मी फसवणूक म्हणणार नाही, पण गाफील का ठेवता?" असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच १२ ॲागस्टला मला एक उद्योगपतीने बोलावले. शरद पवार आणि जयंत पाटील असतील असा मला निरोप आला," म्हणून मी गेलो, असा खुलासा ही त्यांनी पुण्याच्या भेटीबाबत केला. (Latest Marathi News)

Ajit Pawar Sharad Pawar News
Pune Bangalore National Highway Traffic Update : पडळकरांसह हजाराे धनगरांनी राेखला पुणे-बंगळूर महामार्ग, वाहतूक ठप्प

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com