JEE Main 2021 : परीक्षेच्या तिसऱ्या, चौथ्या सेशनच्या तारखा जाहीर Saam Tv
मुंबई/पुणे

JEE Main 2021 : परीक्षेच्या तिसऱ्या, चौथ्या सेशनच्या तारखा जाहीर

तिसऱ्या सत्रांची परीक्षा २० जुलै ते २५ जुलै दरम्यान होणार आहे तर चौथ्या सेशनची परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान देशभरात घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : JEE Mains २०२१ परीक्षेच्या उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये तिसऱ्या सत्रांची परीक्षा २० जुलै ते २५ जुलै दरम्यान होणार आहे तर चौथ्या सेशनची परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान देशभरात घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेच्या तारखा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल Ramesh Pokhriyal यांनी जाहीर केल्या आहेत. JEE Main 2021Dates of 3rd, 4th session of exams announced

हे देखील पहा -

देशातील कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना JEE Mains २०२१ परीक्षेसाठी ४ सेशन ठेवण्यात आले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिकची संधी परिक्षेसाठी मिळेल. ही परीक्षा फेब्रुवारी,मार्च, एप्रिल, मे या महिन्यात पार पडणार होती. त्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या असून दुसऱ्या लाटेत देशभरातील कोरोना स्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्याच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परीक्षा आता जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात घेण्यात येणार आहे. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव परिक्षेचा अर्ज भरला नसेल, त्या विद्यार्थ्यांना JEE Main २०२१ तिसऱ्या सत्रांच्या परिक्षेसाठी ८ जुलै पर्यत अर्ज भरता येणार आहे. तर ९ ते १२ जुलै दरम्यान चौथ्या सेशनसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडता येणार आहेत. खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राची संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवण्यात आली आहे. जेणेकरून सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे काटोकोरपणे पालन होईल याची खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT