ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
BREAKING :ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन
BREAKING :ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधनSaam Tv

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील Mumbai हिंदुजा रुग्णालयात Hunduja Hosptail उपचार सुरु होते. दिलीप कुमार यांनी हिंदूजा रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह Bollywood जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्यामुळे दिलीप कुमार यांना काही दिवसांपूर्वी मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. अभिनेत्री सायरा बानो Saira Banu यांनी सोमवारी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले होते. पण, बुधवारी सकाळी ७.३० वाजता त्यांचे निधन झाले. २९ जूनला त्यांना श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान Mohammad Yusuf Khan असे होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता. १९४४ मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर त्यांचा ‘मिलन’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिले नाही. राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल,अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट चित्रपट दिलीप कुमार यांच्या नावावर आहेत.

‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. ८ वेळा त्यांनी अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. केंद्र सरकारने १९९४ साली त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अतुलनीय कारकिर्दीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना निशान-ए-पाकिस्तान हा पुरस्कार बहाल केला होता.

दिलीप कुमार यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले परंतु त्यांनी त्यावर यशस्वीपणे मात केली. अगदी आयुष्याच्या ९८ व्या वर्षी देखील ते आजारावर मात करुन घरी परतले होते. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com