jaidev thackeray bodyguard news  Saam tv
मुंबई/पुणे

जयदेव ठाकरेंच्या अंगरक्षकाच्या बॅगेतील पिस्तुल, 29 जिवंत काडतुसांची चोरी; मुंबईत खळबळ

mumbai crime news : जयदेव ठाकरेंच्या अंगरक्षकाची सरकारी पिस्तुलाची चोरी झाल्याची घटना घडली. तसेच त्यांच्या बॅगेत 29 जिवंत काडतुसे देखील असल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

जयदेव ठाकरे यांच्या अंगरक्षकाची बॅग आणि सरकारी पिस्तुलाची चोरी

मुख्य आरोपी आशिष पिंड कश्यप अटकेत

चोरीच्या घटनेने मुंबईत खळबळ

संजय गडदे, साम टीव्ही

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाची बॅग चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. बॅग चोरीला गेल्यानंतर वांद्रे रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणात मुख्य आरोपी आशीष पिंड कश्यप याला अटक केली आहे.

सुषांत जयराम गायकवाड (वय 32) असे तक्रारदार अंगरक्षकाचे नाव आहे. ते नवी मुंबईतील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या ते जयदेव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. 27 फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथील एसआरपीएफ ग्रुप 8 येथे मासिक गोळीबार सराव पूर्ण करून ते वांद्रे येथे परतले होते.

रात्री उशिरा घरी जाताना शेवटची लोकल सुटल्याने सुषांत गायकवाड वांद्रे रेल्वे स्थानकातील बाकड्यावर झोपले. पहाटे जाग आल्यावर त्यांची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. या बॅगेत सरकारी पिस्तूल, 29 जिवंत काडतुसे, पोलीस ओळखपत्र, कपडे असा सुमारे 1 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

घटनेची माहिती मिळताच वांद्रे रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आशीष पिंड कश्यप याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वांद्रे रेल्वे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर

महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? 'हा' मोठा राजकीय पक्ष थेट शिवसेनेत विलीन होणार; ठाण्यात एकनाथ शिंदेंचे मोठे धक्कातंत्र

Renuka Shahane Photos : २५ वर्षांची अनोखी प्रेम काहाणी! रेणुका शहाणे अन् आशुतोष राणा पुन्हा अडकलं लग्नबंधनात; अभिनेता म्हणाला- "आनंदाने भरलेला काळ"

CNG Price Hike : पेट्रोल डिझेलनंतर CNG महागला; जाणून घ्या आजचे ताजे दर

Maharashtra School: आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार शाळा? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? वाचा काय आहे नवा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT