जयंत पाटलांच्या मुलाने केला मुलीला प्रपोज, शरद पवारांनी सांगितला पत्रकार परिषदेत किस्सा (पहा व्हिडीओ) SaamTV
मुंबई/पुणे

जयंत पाटलांच्या मुलाने केला मुलीला प्रपोज, शरद पवारांनी सांगितला पत्रकार परिषदेत किस्सा (पहा व्हिडीओ)

आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar Press Conference) घेतली होती या पत्रकार परिषदेला सुरुवात करतानाच त्यांनी एक हटके किस्सा सांगून केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांच्या मुलांच्या लव्हस्टोरीचा किस्सा पवारांनी पत्रकार परिषद सुरु करतानाच सांगितला. मात्र तो किस्सा सांगताना जयंतराव हे पवारांना 'आता नको, नंतर सांगू' असं हळूच सांगत होते तरी देखील शरद पवारांना आपल्या सहकाऱ्यांच्या मुलाची ही लव्हस्टोरी सांगण्याचा काही मोह आवरता आला नाही. (Jayant Patil's son proposed to the girl, Sharad Pawar told the story at the press conference)

राज्यात एका बाजूला सुरु असणारे पवार कुटुंबीयांवरील आयकर विभागाचे छापे, काल महाविकास आघाडीने केलेला महाराष्ट्र बंद, लखीमपूरची हिंसा, मावळचा गोळीबार या सर्व गंभीर गोष्टींवरती भाष्य करण्या आधीच पवारांनी जयंत पाटलांच्या मुलाच्या प्रपोजचा किस्सा सांगितला तो असा.

ते म्हणाले 'आमचे सर्व सहकारी आहेत. त्यातील एका सहकाऱ्याला आनंदाची बातमी द्यायाची आहे. ती तुम्हाला आणि इतर सहकाऱ्यांनाही द्यायची आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आणि या बातमीमुळे आमचा सर्वांचा दृष्टीकोण किती व्यापक झाला आहे बघा. आमच्या जयंत पाटलांच्या चिरंजीवांने काल संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला आहे. आणि त्याला समोरच्या बाजूंनी मान्यता देखील मिळाली आहे. (On the Eiffel Tower in Paris) आता आम्ही वाळवा इस्लामपूर Walva Islampur पर्यंत सीमित नसून आमची आम्ही एकदम पॅरिसला वगैरे जातो आहोत. असं सांगताना पवारांना आणि जयंत पाटलांना देखील हसू आवरता आलं नाही.

दरम्यान ते म्हणाले ठिकाणं इंटरनॅशनल International असंल तरी देखील दोन्ही मुलं मुली डोमेस्टिक Domestic आहेत. स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल अशी माहिती देखील त्यांनी दिली तसेच ते पुढे म्हणाले 'आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जावून काय करतील हे सांगता येत नाही'. असही पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT