जयंत पाटलांनी मानले राणेंचे आभार; म्हणाले 'यावेळी आम्हाला जास्त मुदत दिलीत' SaamTV
मुंबई/पुणे

जयंत पाटलांनी मानले राणेंचे आभार; म्हणाले 'यावेळी आम्हाला जास्त मुदत दिलीत'

राज्यात अनागोंदी कारभार आहे याच कारण राज्यात भाजपचं (BJP) सरकार नाही त्यामुळे, मात्र येत्या मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचं भाकित नारायण राणेंनी आज केलं आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुबंई : राज्यात अनागोंदी कारभार आहे याच कारण राज्यात भाजपचं (BJP) सरकार नाही त्यामुळे, मात्र येत्या मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचं त्यांनी भाकित नारायण राणेंनी आज केलं आहे. तसेच भाजपच सरकार आल्यावरती तुम्हाला अपेक्षित बदल दिसतील, राज्यातील महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, शिवाय माझ्या मनात अनेक गोष्टी आहेत. मात्र त्या मी आताच सांगणार नाही. तसेच आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ जास्त नसल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) केल्यांने राज्याच्या राजकारणात या वक्तव्याची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली.

हे देखील पहा -

राणेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावरती टीका केली आहे. अशातच आपल्या विनोदी शैलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यावरती प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, 'गेली दोन वर्ष आमचे विरोधक वेगवेगळ्या तारखा देत आहेत, नारायण राणे यांचे आभार मानतो कारण त्यांनी यावेळी आम्हाला जास्त मार्च पर्यंत मुदत दिली आहे. तसेच अशा प्रकारची विधाने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पक्ष टिकवण्यासाठी केली आहेत. यावेळी नारायण राणे आमच्यावर जास्त उदार झाले, त्यामुळे त्यांचं आभार असा मिश्कील टोला जयंत पाटील यांनी राणेंनी लगावला आहे.

तसेच घोडेबाजार होउ नये यासाठी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा हा प्रयत्न असून सर्वांनी यात सामंजस्याची भुमिका घेतली पाहिजे, घोडेबाजारात खरा कार्यकर्ता बाजूला राहतो असं देखील ते म्हणाले.

संख्याबळावरती सरकार चालतं -

दरम्यान नारायण राणेंच्या वक्तव्या वरती परब यांनी देखील टीका केली आहे. नारायण राणें काय म्हणतात यावरती नव्हे तर संख्याबळावरती सरकार चालतं असा परब यांनी राणेंना लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT