नाशिक : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज पत्रकारांशी बोलताना ST संपासह (ST strike) इतर अन्य विषयांवरती भाष्य केलं आहे. ते म्हणाले ST संपावर तोडगा काढण्याचे अनिल परब (Anil Parab) यांनी भरपूर प्रयत्न केले. विलीनीकरणासाठी समितीचा अहवाल येईपर्यंत थांबावं लागेल. समितीचा अहवाल येईपर्यंत एसटीचा कारभार कसा थांबवता येईल? सर्व प्रयत्न थकल्यानंतर काय करणार BJP आणि एसटीच्या संपकरी नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर पगारवाढ दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, लोकांचा जास्त अंत पाहू नये, अशी विनंती भुजबळांची एसटी कर्मचाऱ्यांना केली आहे.
हे देखील पहा -
रात्र थोडी सोंग फार -
एसटीसह त्यांनी साहित्य संमेलनावरती देखील भाष्य केलं आहे ते म्हणाले, 'साहित्य संमेलनासाठी वेळ कमी, रात्र थोडी सोंग फार, तसेच निमंत्रण पत्रिकेत सर्वांची नावं टाकायची ठरली, तर वर्तमानपत्रही कमी पडेल शक्य तितक्या चुका कमी होतील, हे पहा असं आयोजकांना सांगितलं असल्याच ते यावेळी म्हणाले तसेच काही लोकांचा त्रागा बरोबर आहे. मात्र काही लोकांना काही करायचं नसतं, त्यांच्याबाबत काही बोलायचं नसल्याच त्यांनी स्पष्ट केलं.
राणेंना भाजपनं थांबायला सांगितलं असावं -
यावेळी भुजबळांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Mechanisms) गैरवापर करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती किंवा त्यांच्या मित्रांवरती छापे टाकायचं भाजपेने ठरवलं असून कुठल्याही परिस्थितीत सरकार पाडायचं भाजपने ठरवलं आहे. तसेच भाजपचे सरकार यावं, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत मात्र त्यांच्या दुर्दैवाने त्यांना यश मिळत नाही, आणि पुढेही काही वर्षे यश मिळेल, असं मला वाटत नाही. असा टोला लगावत नारायण राणेंनी (Narayan Rane) केलेल्या भाकीतावरती ते म्हणाले 'थांबा म्हणजे राणेंना भाजपनं थांबायला सांगितलं असावं' असा चिमटाही त्यांनी राणेंना यावेळी काढला.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.