सुशांत सावंत
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या खात्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे देण्यात यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. मुख्यमंत्री लवकरच या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Jayant Patil proposed to give the responsibility of Nawab Maliks Department Jitendra Awhad and Rajesh Tope).
नवाब मलिकांचं कौशल्य विकास हे खातं राजेश टोपे यांना तर, अल्पसंख्यांक या खात्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे देण्याचा प्रस्ताव जयंत पाटलांनी (Jayant Patil) ठेवला आहे.
राखी जाधव आणि नरेंद्र राणेंकडे मलिकांचे पद सांभाळण्याची जबाबदारी
नवाब मलिक यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पदभार सांभाळण्यासाठी राखी जाधव या कार्यध्यक्ष म्हणून आणि नरेंद्र राणे यांची नियुक्ती करण्यात आलीये.
नवाब मलिकांच्या राजीनाम्याला राष्ट्रवादीचा विरोध
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर मुंबईच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण, नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली होती.
Edited By - Nupur Uppal