jayant patil  saam tv
मुंबई/पुणे

Jayant Patil on Sharad pawar-NCP leader meet : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला; कॅबिनमध्ये जे झालं जयंत पाटलांनी सगळं सविस्तर सांगितलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नव्याने मंत्री झालेल्या नेत्यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेचली. या भेटीत झालेल्या चर्चेबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय रणनिती असावी यासाठी आमची बैठक सुरु होती. त्यावेळी मला अचानक सुप्रियाताईंचा फोन आला. त्यांनी मला तातडीने यशवंतराव चव्हाण सेंटरला बोलावलं.

तेथे राष्ट्रवादीतून फुटलेले सर्व मंत्री आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि हे सर्व उपस्थित होते. त्यांनी पवार साहेबांकडे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. झालेल्या घटनेतून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी पवार साहेबांना केली आहे. त्यावर शरद पवार साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे सर्व अचानक आणि अनपेक्षितपणे घटलं आहे. आम्ही सर्व एकत्र बसू आणि यावर चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

अचानकपणे त्यांनी ही भेट घेतलेली आहे. त्यांचा उद्देश काय हे आजच सांगणं अवघड आहे. पक्ष एकत्रित राहावा यासाठी काहीतरी मार्ग काढावा अशी त्यांनी विनंती केली. मात्र पवार साहेबांनी अजूनतरी कोणतीही भूमिका घेतलीली नाही, असं असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे

राष्ट्रवादीच्या १९ ते २० आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे असेल, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. (Political News)

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

आम्ही पवार साहेबांकडे आशिर्वाद मागितले. पक्ष एकसंध कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी विचार करावा यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली आहे, असं प्रुफल्ल पटेल यांनी म्हटलं.

पवार साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आमचं मत ऐकून घेतलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. उद्यापासून आम्ही आपापल्या विभागाची जबाबादारी विधानसभेमध्ये पार पाडू, असंही प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar Firing Case : कोपरगावात भरदिवसा गोळीबार, VIDEO

Bachelor Party Destination : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय? 'या' ठिकाणी प्लान करा बॅचलर पार्टी

Congress Protest: राहुल गांधींचा अपमान सहन करणार नाही, वाचाळवीरांना लगाम घाला; काँग्रेसचं आंदोलन, भाजपला इशारा

Maharashtra News Live Updates: मी निवडणूक लढण्यावर ठाम - माजी पोलीस आयुक्त संजय पांडे

IND vs BAN 1st Test: जडेजा अन् अश्विनच्या जोडीने रचला इतिहास! मोडून काढला 15 वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT