Jayant Patil Meet Sharad Pawar Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Jayant Patil Meet Sharad Pawar: जयंत पाटील घेणार शरद पवारांची भेट; राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी

Jayant Patil Meet Sharad Pawar: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jayant Patil Meet Sharad Pawar: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या निर्णयानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली. येत्या दोन ते तीन दिवसांत मी माझ्या निर्णयाचा फेरविचार करेल, असंही शरद पवार यांनी अजित पवारांना सांगितलं. (Latest Marathi News)

दरम्यान, या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील (Jayant Patil) नाराज आहेत, अशा चर्चा आज सुरू होत्या. आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला त्यांना बोलवलं नसल्याची चर्चा होती. मात्र, यावरउत्तर देताना जयंत पाटील यांनी मला या बैठकीबाबत माहिती नाही. कदाचित मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसावी, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.

राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची बैठक असेल त्यामुळे मला बोलवलं नसेल अशी प्रतिक्रिया सुद्धा जंयत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर या जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. दरम्यान, आता जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती आहे. (Breaking Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी हे सर्वजण करत आहेत. पण अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT