Jayant Patil News: जयंत पाटील नाराज नाहीत? माध्यमांशी बोलताना म्हणाले, माझं सुप्रिया सुळेंशी बोलणं झालं...

Rashtrawadi New President: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत अशा चर्चा आज सुरु होत्या. आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला त्यांना बोलवलं नसल्याची चर्चा होती.
Jayant Patil
Jayant PatilSaam tv

NCP New Chief: आज कोणतीही बैठक झाली नाही, संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. माझं सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी आज अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे सांगितले आहे, असे जंयत पाटील यांनी सागितले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत अशा चर्चा आज सुरु होत्या. आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला त्यांना बोलवलं नसल्याची चर्चा होती. यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी मला या बैटकीबाबत माहिती नाही. कदाचित मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसावी, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची बैठक असेल त्यामुळे मला बोलवलं नसेल अशी प्रतिक्रिया जंयत पाटील यांनी दिली होती. त्यांनंतर या चर्चांनी जोर धरला होता.

Jayant Patil
Jayant Patil on Sharad Pawar : नाराज जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, पवार साहेबांकडे बघून आम्ही पक्षात आलो होतो...

'मुनगंटीवारांच्या विधानांमध्ये प्रचंड तिरस्कार...'

यावेळी बोलताना जंयत पाटील यांनी मुनगंटीवारांवर देखील टीका केली. जे पद अस्तित्वातच नाही त्याचा राजीनामा दिला म्हणजे काय असं वेगळं केलं अशी टीका मुनगंटीवार यांनी केली होती, त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले. सुधीर मुनगंटीवाराचा राष्ट्रवादीबाबत बोलताना नेहमी तोल का जातो, हेच मला कळत नाही. प्रत्येक गोष्टीत टेक्निकल मुद्दे उपस्थित करून राजकारण होत नाही. राजकारण हे लोकांच्या, समाजांच्या मानण्यावर असतं. सुधीर मुनगंटीवारांच्या विधानांमध्ये प्रचंड तिरस्कार दिसतोय. अनेक चुकीची विधानं ते करत आहेत, असे जंयत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी हे सर्वजण करत आहेत. पण अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष (Rashtrawadi New President) कोण होणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (Latest Political News)

Jayant Patil
Supriya Sule To Become President Of NCP: अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंच्या नावाला का दिली जातेय पसंती?, ही आहेत यामागची कारणं

सुप्रिया सुळेंच्या नावाला पसंती...

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील आणि प्रुफल्ल पटेल ही चार नावं आघाडीवर आहेत. पण आता राष्ट्रवादीचे हे अध्यक्ष पद सुप्रिया सुळे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत साम टीव्हीला खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील सुप्रिया सुळेंच्या नावाला पसंती देखील दिली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com