BMC Covid Scam Update News SAAM TV
मुंबई/पुणे

Covid Centre Scam: कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ईडीकडून ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल

Jambo Covid Center Scam Case: ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

Satish Daud

सचिन गाड, साम टीव्ही

Jambo Covid Center Scam Case Latest Updates

मुंबईतील कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीकडून शुक्रवारी विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.  (Latest Marathi News)

७५ पानांच्या या आरोपपत्रात सुमारे सुजीत पाटकर यांच्यासह ६ जणांनी ३२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडीच्या सूत्रांनी (ED) याबाबतची माहिती दिली आहे. माहितीनुसार, एनएससीआय वरळी व दहिसर येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्विस कंपनीला मिळाले होते.

त्याबाबत कंपनीकडून महापालिकेला सादर केलेला हजेरीपट व कागदपत्रे बनावट असल्याचे ईडीला तपासात निदर्शनास आले. इतकंच नाही, तर कोरोना केंद्रांवर कमी वैद्यकीय कर्मचारी कार्यरत असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या फुगवण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आलाय.

हा सर्व प्रकार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. तसेच कंपनीला कंत्राट मिळवून देण्यात सुजीत पाटकर यांची महत्त्वाची भूमिका होती. या गैरप्रकारातून मिळालेली मोठी रक्कम पाटकरांच्या बँक खात्यावर जमा झाल्याचा दावा देखील ईडीने केला आहे.

याप्रकरणी सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता, संजय शाह, राजीव साळुंखे, डॉ. किशोर बिसुरे, लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्विस कंपनी व डॉ. अरविंद सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. आम्ही काही संशयित मालमत्तांची माहिती मिळवली आहे. त्यांच्यावर टाच आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

SCROLL FOR NEXT