IND vs BAN: टीम इंडियाच्या हातातून सामना कुठून निसटला? जाणून घ्या भारताच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट

IND vs BAN Match Result: या सामन्यात भारतासाठी एक गोष्ट टर्निंग पॉइंट ठरली आणि तिथेच भारताने हा सामना गमावल्याचे पाहायला मिळाले.
भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच आशिया कप 2023
भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच आशिया कप 2023Saam TV
Published On

Bangladesh Won The Match Against India:

आशिया कप २०२३ स्पर्धेत सुपर-४ फेरीतल्या अखेरच्या सामन्यात बांग्लादेशने टीम इंडियावर ६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांग्लादेशने आपला शेवट गोड केला. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने टीम इंडियासमोर विजयासाठी २६६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २५९ धावांवरच ढेपाळला. (Latest Marathi News)

भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच आशिया कप 2023
Virat Kohli Funny Video : 'वॉटर बॉय' बनून आला अन् भाव खाऊन गेला, विराटच्या भन्नाट व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ

एकवेळ भारतीय संघ हा सामना जिंकणार असं वाटत होतं. पण बांग्लादेशच्या गोलंदाजांनी ऐन मोक्याच्या क्षणी टिच्चून मारा केला. या सामन्यात भारतासाठी एक गोष्ट टर्निंग पॉइंट ठरली आणि तिथेच भारताने हा सामना गमावल्याचे पाहायला मिळाले. शुभमन गिलने शतकी खेळी करत टीम इंडियाला या सामन्यात जीवंत ठेवलं होतं.

पण, अखेरच्या काही षटकात धावगती वाढवण्याच्या नादात त्याने मोठा फटका मारला. शुभमन गिल १२१ धावा काढून बाद झाला. पण गिल बाद झाला असला तरी भारताच्या हातून हा सामना निसटला नव्हता. कारण त्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेलने भारतीय संघाचा (Team India) मोर्चा आपल्या हातात घेतला.

अखेरच्या ३ षटकांत टीम इंडियाला विजयासाटी ३१ धावांची गरज होती. ४८ व्या षटकात अक्षरने एक चौकार आणि षटकार खेचत सामना भारताच्या दिशेने फिरवला. अक्षर चांगल्या फॉर्मात दिसत होता आणि त्याचे फटकेही चांगले लागत होते. त्यामुळे तो संघाला विजय मिळवून देईल, असे वाटत होते.

४९ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने दमदार चौकार देखील लगावला. पण त्यानंतरच्या चेंडूवर तो पुन्हा एक मोठा फटका मारायला गेला आणि आपली विकेट्स गमावून बसला. मुस्तफिजूर रहिमने ४९ व्या षटकात टीम इंडियाला एकापाठेपाठ एक दोन धक्के दिले. टीम इंडियाच्या पराभवाचा हाच टर्निंग पॉइंट ठरला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com