Dombivli Building Collapse: डोंबिवलीत मोठी दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

Dombivli Building Collapse: डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली.
Dombivli Building Collapse:
Dombivli Building Collapse: Saam tv

अभिजीत देशमुख

Dombivli Building Collapse:

डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. आज शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवलीतील अहिरे रोड परिसरात ही घटना घडली आहे. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील आदिनारायण कृपा बिल्डिंग आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन आणि तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी प्रयत्न करत होते.

Dombivli Building Collapse:
Mumbai Rain Update: मुंबईसह उपनगरांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

दरम्यान, आदिनारायण कृपा बिल्डिंगमध्ये 40 कुटुंब राहत होते. या इमारतीला धोकादायक म्हणून जाहीर केले होते. त्यातील कुटुंबांना घर रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली होती. तसेच या इमारतीलगत देखील एक चाळ होती. या चाळीतील रहिवाशांना देखील खोल्या रिकामा करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या.

इमारत कोसळून एकाचा मृत्यू

डोंबिवली पूर्वेकडील आदिनारायण कृपा बिल्डिंग कोसळली. डोंबिवलीत ही तीन मजली इमारत साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीसाठी घराखाली दोन जण अडकले होते.

त्यातील ५४ वर्षीय दीप्ती लोढिया या महिलेला इमारतीच्या ढिगार्‍या खालून जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या दुर्घटनेत दीप्ती लोढिया यांचे पती सुनील लोढिया यांचा मृत्यू झाला आहे. तसेच रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ढिगाराखाली अडकलेले अरविंद भाटकर यांना बाहेर काढण्यात आले. भाटकर यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Dombivli Building Collapse:
Gosekhurd Dam : गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले; दमदार पावसाने पाणी पातळीत वाढ

अन् थोडक्यात जीव वाचला

इमारतीलगत असलेल्या एका खोलीत शोएब मलिक हा तरुण त्याच्या दोन मित्रांसह राहत होता. सायंकाळी चार वाजता सुमारास हा शोएब मित्रांसह घराबाहेर पडला. अवघ्या काही मिनटात इमारत कोसळली. इमारतीचा काही भाग शोएब राहत असलेला घरावर देखील कोसळला.

शोएब आणि त्याचे मित्र काही मिनिटांपूर्वीच घराबाहेर पडले होते. त्यामुळे त्यांचा जीव बचावला. दरम्यान, सहायक आयुक्त सोनम देशमुख आणि त्यांचे पथक इमारती बाहेर पडून काही अंतरावर गेले असतानाच ही इमारत कोसळली. या दुर्घटनेत त्यांचाही जीव थोडक्यात वाचला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com