Gosekhurd Dam : गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले; दमदार पावसाने पाणी पातळीत वाढ

Bhandara News : गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले; दमदार पावसाने पाणी पातळीत वाढ
Gosekhurd Dam
Gosekhurd DamSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्यात काळ सायंकाळपासून दमदार पाऊस झाला आहे. यामुळे भंडारा (Bhandara) जिल्ह्यात वैनगंगा नदीचा जलसाठ्यात वाढ झाल्याने गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले (Gosekhurd Dam) असल्याने साधारण २ लाख ९१ हजार ५०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. (Latest Marathi News)

Gosekhurd Dam
Kalyan News: भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण; टिटवाळा परिसरातील अजब प्रकार

मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा लागून होती. परंतु कालपासून जिल्यातील अनेक भागात दमदार पावसाची हजेरी (Heavy Rain) लागली आहे. यामुळे बहुतांश नदी- नाल्यांना पाणी आले आहे. यात  भंडारा जिल्ह्यात पावसाने काल दुपारपासून दमदार हजेरी लावल्याने गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे सकाळीच धरणाचे काही दरवाजे उघळण्यात आले होते. 

Gosekhurd Dam
Pandharpur News : आरक्षण मिळेल की नाही हे सांगायला मी मुख्यमंत्री नाही; छत्रपती संभाजीराजे यांचा उपरोधिक टोला

गावांना सर्तकतेचा इशारा  
गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून दुपारी धरणाचे ३३ पैकी ३३ दरवाजे उघडले आहेत. यात ९ दरवाजे दीड मीटरने तर २४ दरवाजे एक मीटरने उघडले आहेत. यातून २ लाख ९१ हजार ५०५ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठावर आवगमन करणाऱ्या नागरिकांनी तसेच नदी काठावर वसलेल्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. यंदा चौथ्यांदा गोसे खुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आली आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com