Jalna News Saam Digital
मुंबई/पुणे

Jalna News : बँका, बचत गट, सावकाराच्या कर्जाचा डोंगर, यावर्षी विहिरही आटली; शेतकरी दाम्पत्यांने विष प्राशन करून संपवलं आयुष्य

Framers Problem : अंबड तालुक्यातील बनटाकळी गावातील गट न. 5 कर्जाला कंटाळून शेतकरी पती-पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक नानासाहेब कानकाटे व संगीता अशोक कानकाटे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.

Sandeep Gawade

Jalna News

अंबड तालुक्यातील बनटाकळी गावातील गट न. 5 कर्जाला कंटाळून शेतकरी पती-पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक नानासाहेब कानकाटे व संगीता अशोक कानकाटे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे. याची नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

आज सकाळी नऊ वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. अशोक आणि संगीता यांच्यावर बचत गट, मायक्रो फायनान्स कंपनीचे व समर्थ सहकारी बँक आणि ग्रामीण बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यांतच गेल्या वर्षी मुलीच्या लग्नालाही त्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. या वर्षी विहिरीला पाणी नसल्याने हे कर्ज या वर्षी कसे फेडावं या विवंचनेत हे पती -पत्नी होते. या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. याप्रकणाचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू

नाशिकच्या देवळा तालुक्यातील बुटेश्वर शिवारात आज सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडलीय. शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. तेजस व मानव गणेश आहेर अशी या दोन्ही मुलांची नाव आहेत. दुपारच्या सुमारास शाळेतून घरी परत आल्यावर घरातील सर्व जण कांदा काढणीच्या कामात व्यस्त असताना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long Haircuts For Women: लांब केसासाठी 5 युनिक हेअरकट्स, जे करायला सोपे अन् दिसायला भारी

Stroke risk reduction: छोटी चूक ठरू शकते जीवघेणी! तुमच्या 'या' 5 सवयी टाळू शकतात स्ट्रोकचा धोका

Marathi Movie: शिवरायांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेचा इतिहास रुपेरी पडद्यावर; रणपति शिवराय या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Mumbai News: ठाकरे बंधूबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसे-ठाकरेसेनेचे कार्यकर्त्यांकडून तरुणाला अर्धनग्न करत मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT