"त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात; औरंगजेबचे नव्हे" SaamTV
मुंबई/पुणे

Maharashtra : "त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात; औरंगजेबचे नव्हे"

त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ काल 12 नोव्हेंबरला राज्यातील मुस्लिम संघटनांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले. अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत प्रचंड हिंसाचार झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : त्रिपुराच्या Tripura घटनेच्या निषेधार्थ काल 12 नोव्हेंबरला राज्यातील मुस्लिम संघटनांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले. अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत (Amravati, Nanded, Malegaon, Bhiwandi, Parbhani) प्रचंड हिंसाचार झाला. अमरावती मध्ये निघाल्या मोर्चामध्ये हजारो जण सहभागी झाले होते दरम्यान या जमाव हिंसक झाला आणि त्यांनी दुकानांची तोडफोड लूट केली तसेच पोलिसांवर दगडफेक केल्याच्याही घटना घडल्या.

दरम्यान या सर्वा पार्श्वभूमीवरती भाजपच्या अनेक नेत्यांनी या हिंसेची निंदा केली असून भाजप आमदार नितेश राणे Nitesh Rane यांनी कालच्या मोर्चाची तुलना राज्यातील मराठा समाजाने आरक्षणासाठी काढलेल्या 58 मोर्चांसोबत Maratha Morcha केली असून त्यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विट Tweet मध्ये त्यांनी लिहलं आहे 'मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले कालच्या पेक्षा मोठे पण कोणाला ही त्रास झाला नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात. औरंगजेबचे नाही !!!' दरम्यान कालच्या मुस्लिम मोर्चावेळी अमरावती मध्ये करण्यात आलेल्या तोडफोडीचा आणि हिंसेचा निषेध करण्यासाठी आज अमरावतीत भाजपतर्फे Amravati BJP शहर बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabudana Khichdi Recipe : झटपट बनवा मोकळी-लुसलुशीत साबुदाणा खिचडी; १० मिनिटांत तयार होईल, पाहा रेसिपी

Manipur Crime: भयंकर! मणिपूरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, शरीरात खिळे ठोकून जिवंत जाळले

IND vs SA 3rd T20I: पहिल्याच बॉलवर Ramandeep Singhने रचला इतिहास! ठरला दुसराच भारतीय फलंदाज

Health Tip: टेंशन कमी करण्याचे 'हे' आहेत उपाय

Maharashtra News Live Updates :नागपूर - सुरत महामार्गावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT