ST संपाबाबत साधी बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले; पडळकरांचे टीकास्त्र
ST संपाबाबत साधी बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले; पडळकरांचे टीकास्त्र SaamTV
मुंबई/पुणे

ST संपाबाबत साधी बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले; पडळकरांचे टीकास्त्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब (Sharad Pawar, Ajit Pawar,Anil Parab) यांच्यामध्ये ST कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबतचा तोडगा काढण्यासाठी जवळपास अडीच तासांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती अनिल परब यांनीच माध्यमांना दिल्याने आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

हे देखील पहा -

पडळकर म्हणाले 'आजची बैठक सरकारने घेतली मात्र त्यासाठी आझाद मैदानावरील आंदोलनाचा 13 वा उजाडावा लागला तरीही अद्याप पर्यंत कोणताही ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होतं आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी अशा सर्वच लोकांशी संबंधित एसटीचा विषय असताना देखील केवळ बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले आणि धड या बैठकीतही कुठला निर्णय देखील झाला नाही. त्यावरुन हे निर्णयक्षम सरकार नसून यांच्यामध्ये एकमत नसल्याचं स्पष्ट होतं आहे.' अशी टीका पडळकरांनी केली आहे. तसेच ठाकरे सरकार (Thackeray Government) कोर्टाचा दाखला देण्याशिवाय काहीच करत नसून शेवटी आमच्या हातात काय आहे जर आमच्या हातात काय असतं तर आम्ही या मैदानावरती 13 दिवस थांबलो असतो का? असही पडळकर म्हणाले.

दरम्यान पडळकरांनी शरद पवारांवरती गंभीर आरोप केला ते म्हणाले ' शरद पवारांनी 50 वर्षांपासून ST कर्मचाऱ्यांचं नेतृत्व केलं आहे. मान्यताप्राप्त संघटना (Accredited organization) देखील त्यांचीच आहे. मात्र आता ST कर्मचाऱ्यांनी सगळ्या संघटनांना बाजूला केलं आहे. त्यामुळे यांची पोळी भाजली जाणार नाही याची चिंता त्यांना लागली असून ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला तर त्यातून काहीच मिळणार नसल्यानेच हा प्रश्न सोडविण्यात येत नसल्याचा गंभीर आरोप पडळकरांनी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

Pune News : रात्री 12 वाजता बॅंक सुरु! निवडणूक आयोगाची बॅंकेवर मोठी कारवाई

Special Report : Election Scam | माढ्यात नकली नोटांचा पाऊस! उत्तम जानकरांचा आरोप काय?

IPL 2024 DC vs RR: घरच्या मैदानात दिल्लीची फटकेबाजी; राजस्थानसमोर २२२ धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT