24 तासात राष्ट्रवादीला दोन मोठे झटके, अजित पवारांच्या मालमत्तेवर IT ची कारवाई Saam Tv
मुंबई/पुणे

24 तासात राष्ट्रवादीला दोन मोठे झटके, अजित पवारांच्या मालमत्तेवर IT ची कारवाई

या कारवाईमुळे आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - 24 तासात राष्ट्रवादीला दोन मोठे झटके बसले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे हा महाविकास आघाडीला दुसरा झटका मानला जात आहे. या कारवाईमुळे आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हे देखील पहा -

अजित पवार यांच्याशी निगडीत आयकर विभागाने ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. ही संपत्ती जवळपास १००० कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, आयकर विभागाने ज्या संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील मालमत्ता, मुंबईमधील निर्मल इमारतीचा समावेश आहे.

अजित पवार त्यांचे कुटुंबीयांवर क आणि निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाकडून झाडाझडती करण्यात येत आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या संबंधित मालमत्ता जप्तीची नोटीस आयकर विभागाने काढली आहे.

'या' संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश

जरंडेश्वर साखर कारखाना – अंदाजित किंमत ६०० कोटी

निलय नावाचं गोव्यातील रिसोर्ट – २५० कोटी

पार्थ पवार निर्मल ऑफिस – २५ कोटी

दक्षिण दिल्लीतील फ्लॅट – २० कोटी

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या जमिनी – जवळपास ५०० कोटी

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : २०० फूट खोल दरी, उंच कातळभिंती अन् अंधारलेली वाट; मुंबईजवळ लपलंय 'हे' रहस्यमय ठिकाण

Maharashtra News Live Update: सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख

Lack of sleep: 8 तासांपेक्षा कमी झोप घेताय? हे गंभीर आजार होण्याचा वाढतो धोका

Veen Doghatli Hi Tutena : राजवाडेंचा रोमँटिक अंदाज अन् कँडल लाईट डिनर डेट; समर देणार स्वानंदीला गोड सरप्राईज, VIDEO एकदा पाहाच

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT