Isha Ambani ANI/@Twitter
मुंबई/पुणे

Isha Ambani : जुळ्या बाळांसह ईशा मायदेशी; अंबानी कुटुंब दान करणार ३०० किलो सोनं

अंबानी परिवार ३०० किलो सोने दान करणार!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबासाठी आजचा दिवस खास आहे. कारण आज मुकेश यांची मुलगी ईशा अंबानी आपल्या जुळ्या मुलांसह मायदेशी भारतात दाखल झाली आहे. ईशा आणि तिच्या लाडक्या मुलांचे स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंबाने जोरदार तयारी केली होती. दरम्यान, याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहे.

देशभरातील मोठ्या मंदिरांमधील पुजाऱ्यांना आज इशा आणि आनंद यांच्या वरळी येथील ‘करुणा सिंधू’ निवासस्थानी या जुळ्या मुलांचं स्वागत करण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. या ठिकाणी धार्मिक सोहळा पार पडणार आहे. अंबानी कुटुंबीय या निमित्ताने 300 किलो सोनं दान करणार आहेत. (Tajya News)

20 नोव्हेंबरला ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. 12 डिसेंबर 2018 ला ईशा अंबानी हिचा विवाह पीरामल समूहाच्या आनंद पिरामल यांच्याशी झाला. देशातल्या सर्वात महागडल्या विवाह सोहळ्यांपैकी हा एक होता. या दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुलं झाल्याने अंबानी आणि पीरामल कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया ठेवण्यात आलं.

पूजा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. अंबानी कुटुंब त्यांच्या घरातील भव्य सोहळ्यात तिरुपती बालाजी, तिरुमला, श्रीनाथजी, नाथद्वारा आणि श्री द्वारकाधीश आणि इतर ठिकाणांसारख्या भारतातील मोठ्या मंदिरांमधून आलेला प्रसाद देणार आहेत. तसेच अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून पाच अनाथाश्रम सुरु केली जाणार आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT