Maharashtra Weather : राज्यात पुन्हा हुडहुडी; अनेक ठिकाणी पारा 15 अंशांच्या खाली

राज्यभरात पुढील दोन दिवस हुडहुडी जाणवणार
Maharashtra Weather
Maharashtra WeatherSaam Tv
Published On

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे जोरदार पुनरागमन झाले आहे. विविध जिल्ह्यातील कमाल तापमानात घट झाल्यामुळं हवामानात गारवा पसरला आहे. अनेक भागात पारा पुन्हा 15 अंशांच्या खाली गेला आहे.काडकाच्या थंडीमुळे (Winter Season) ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे.

Maharashtra Weather
Aurangabad: धक्कादायक! गर्भपातासाठी पत्नीला खाऊ घातल्या गरजेपेक्षा जास्त गोळ्या; महिलेचा मृत्यू

आज उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाच्या उत्तर भागात किमान तापमानात घट होणार आहे. तसेच राज्यभरात पुढील दोन दिवस हुडहुडी जाणवणार असल्याचा अंदाज  अंदाच हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने परभणीत राज्यातील नीचांकी 10.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत देखील यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे. (Maharashtra News)

निफाडमध्ये तापमानाचा पारा घसरला

नाशिकच्या (Nashik) तापमानात कमालीची घट झाली आहे. निफाडमध्ये ७.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत तापमानात आज ३.७ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. २४ तासांत निफाडच्या तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यांत प्रचंड थंडी जाणवत असून दोन दिवसांपासून सकाळी बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात हुडहुडी..

यवतमाळ जिल्ह्यात थंडीची तीव्रता अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागासह शहरांमध्ये शेकोट्या मोठ्या प्रमाणात पेटवल्या जात आहेत. रब्बी हंगामाच्या पिकासाठी प्रकल्पातून पाणी सोडल्या जात असल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather
National Consumer Day : आज भारतीय ग्राहक दिवस जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि कोट्स

परभणीतही थंडीचा कडका

परभणी गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन झालं आहे. गेल्या चार दिवसांपासून परभणीत थंडीचा कडाका कायम आहे. सलग तीन दिवस परभणीचे तापमान हे 10 अंशावर होते. या थंडीमुळं ग्रामीण भागासह शहरात शेकोट्या पेटत असून नागरिक।उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत.

मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद

दरम्यान, मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. आज देखील मुंबईतील किमान तापमानात घट होण्याचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्याचं चित्र दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com