उल्हासनगर महापालिकेचा रस्ता आहे की वाहनतळ? अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगर महापालिकेचा रस्ता आहे की वाहनतळ?

उल्हासनगर महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेला रस्ता नक्की कुणासाठी तयार केला आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेला रस्ता नक्की कुणासाठी तयार केला आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हासनगर कॅम्प 3 भागातील हिराघाट ते संत थायरा सिंग गुरुद्वारा हा 400 मीटरचा रस्ता महापालिकेने 2 कोटी रुपये खर्च करून तयार केला आहे. (Is it Ulhasnagar Municipal Corporation road or parking lot?)

हे देखील पहा -

मात्र महापालिकेने ज्या करण्यासाठी हा रस्ता बांधला आहे तो उद्देश मात्र साध्य झाला नाहीये. कारण तब्बल 2 कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या या रस्त्यावर दिवसभर कार, टेम्पो, रिक्षा हातगाड्या उभ्या असतात. सदर रस्ता अक्षरशः वाहनतळ बनला आहे. संतापजनक बाब म्हणजे यामुळे या नवीन रस्त्याचा वापर नागरिकांना करता येत नसून जुन्याच रस्त्याचा वापर त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक आता प्रश्न विचारत आहेत की, उल्हासनगर नगरपालिकेने जनतेचे 2 कोटी रुपये वाहनतळ आणि फेरीवाले उभे राहण्यासाठी खर्च केले आहेत का?

याबाबत महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना विचारले असता सदर रस्ता नागरिकांना जाण्या-येण्यासाठी बांधण्यात आला असून या रस्त्यावर वाहन अथवा फेरीवाले उभे राहत असतील तर लवकर त्यांच्यावर कारवाई करून हा रस्ता नागरिकांसाठी मोकळा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT