दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक...

मराठी पाट्यांसाठी मनसेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत दुकानदारांसह ठाणे महापालिकेला १५ दिवसांचा अवधी दिला आहे. अन्यथा खळखट्याक करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक...
दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक...प्रदीप भणगे
Published On

दिवा : ठाणे महापालिका आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शीळ गाव आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात मोठं मोठाली दुकाने सुरु झाली आहेत. मात्र या दुकानांवरील पाट्या या मराठी भाषेत न लावता दुकानदारांनी गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लावल्या आहेत. त्यामुळे आता मनसेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत दुकानदारांसह ठाणे महापालिकेला १५  दिवसांचा अवधी दिला आहे. अन्यथा खळखट्याक करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. (MNS is aggressive again for Marathi signs on shops ...)

हे देखील पहा -

ठाणे महापालिकेला क्षेत्रात फेरीवाल्याचा विषय ताजा असताना मराठी पाट्यांचा विषय आता पुढे आला आहे. शीळगाव आणि दिवा परिसरात बाहेरील राज्यातून आलेले नागरिक जास्त आहेत, त्यामुळे तेथील दुकानदार मराठी पाट्या न लावता इतर भाषेत लावतात. त्यामुळे मनसेनं पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दाही उचलून धरला आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना या बाबतच पत्र देखील दिल आहे. त्यामुळे आता मनसेच्या इशाऱ्यानंतर दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये होतात कि, मनसेला खळखट्याक करण्याची वेळ येते हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक...
पत्रिका न जुळणे हे लग्न मोडण्याचे कारण असू शकत नाही- उच्च न्यायालय

याबाबत मनसेचे उपविभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी सांगितले की अनेक संस्था, दुकाने, आस्थापना हे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठी भाषेचा वापर करीत नाही असे सर्वत्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रथम त्या भाषेचा आदर करुन नावाच्या पाट्या स्वच्छ, सुंदर, सुवाच्य अक्षरात लावल्या पाहिजेत. दुकाने व संस्था अधिनियम १९४८ अन्वये हे बंधनकारक असतानाही अनेक दुकानदार, आस्थापना व संस्था या बाबीकडे कानाडोळा करुन सदर नियमाचा भंग करीत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com