irregular water supply in kalyan and dombivli citizens andolan in kdmc  Saam Digital
मुंबई/पुणे

कल्याण- डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट, शिवसेना, भाजपचे आक्रमक आंदोलन; अधिकाऱ्यांना दिली दूषित पाण्याची बाटली!

irregular water supply in kalyan and dombivli citizens andolan in kdmc : जाेपर्यंत नागरिकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत अधिकारी, कर्मचा-यांना महापालिकेतून जाऊ देणार नाही असा इशारा आंदाेलकांना दिला.

Siddharth Latkar

अभिजित देशमुख, कल्याण | साम टीव्ही

कल्याणमधील बेतुरकर पाडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु केडीएमसी अधिकारी त्याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही असा आराेप उगलेंनी केला.

आज उगले यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाण्याची बाटली भेट दिली. यावेळी उगलेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं. बेतुरकर पाडा परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची तत्काळ बदली करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील उगलेंना दिला.

डोंबिवलीत पाण्यासाठी नागरिकांचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरात अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिक संतप्त झालेत. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी केल्यानंतर आज महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकारी शेलार नका परिसरात आले. त्यावेळी संतप्त नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.

आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत रहायचे का असा प्रश्न विचारला. या वेळी एका ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्याने त्यांना जवळील दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या मांडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT