>> संजय गडदे
Mumbai Crime News: मुंबईत आयपीएल मॅचवर सट्टा लावणे चांगलेच महागात पडले आहेत. सट्टा लावणाऱ्या 8 तरुणांना मुंबईच्या खार पोलिसांच्या गुन्हे पथकाने अटक केली आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) क्रिकेट सामन्यावर सट्टा लावताना आठ सट्टेबाजांना मुंबईच्या खार पोलिसांच्या गुन्हे पथकाने अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 3 लॅपटॉप, 13 मोबाइल, एक एलसीडी टीव्ही एक फायर बॉक्स असा दोन लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दोन बुकिंचा शोध सुरू आहे.
तुषार संतोष सावडिया (25 वर्ष), रवींद्रसिंग जगनारायणसिंग राठोड (34 वर्ष), पराख राजेश शिवहरे (28 वर्ष), नीरज संजय सावडीया (23 वर्ष), विक्रम घनश्याम कच्छावा (25 वर्ष), रोहित जगदीश गहलोत (32 वर्ष), फरहान मलिक अन्वर अहमद (28 वर्षे) आणि विक्रम सिंग चौहाण (28 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर हॅरी ईश्वनी व सौरभ या दोन बुकिंचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)
ओशिवरा लोखंडवाला परिसरातील यमुनानगर येथील ग्रीन क्रस्ट सोसायटीतील फ्लॅट नंबर 504 मध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती खार पोलीस ठाणे यांना मिळाली होती. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खार पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून आठ सट्टेबाजांना अटक केली असून तेथून 3 लॅपटॅाप, 13 मोबाइल, 1 एलईडी टीव्ही आणि फायर बॉक्स असा 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (News on IPL in Marathi)
ओशिवरा पोलीस ठाणे येथे कलम 420, 34 भा.द.वि सह कलम 4 (अ) 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा सह कलम 66 (क) (ड) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 सह टेलीग्राफ अॅक्ट कलम 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर सर्व आठ आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.