Mumbai Fake iphone news
Mumbai Fake iphone news Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai News: iPhone घेणाऱ्यांनो सावधान! मुंबईसह देशभरात बोगस आयफोनची विक्री, तिघांना पोलिसांनी केली अटक

Priya More

Mumbai Police: मुंबईसह संपूर्ण देशभरात बोगस आयफोन (iPhone) विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi Police) या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. शमी अहमद गुलफाम अहमद, आदिल नवाब अहमद आणि अहमद नवाज शमीम अहमद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. या तिघांविरोधात मुंबईसह देशभरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथे राहणाऱ्या रविंद्र विष्णू आहेर यांचा विश्वास संपादन करून 3 डिसेंबर 2022 रोजी अज्ञात व्यक्तीने त्यांना स्वस्तात आयफोन विकला. या बदल्यात आहेर यांनी 80 हजार रुपये दिले. पण आहेर यांना मिळालेला आयफोन बोगस असल्याचे समजतात त्यांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. आरोपींच्या मोबाईल क्रमांकावर गेल्या तीन महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते.

आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक माहिती घेऊन आरोपी जे. जे रोड, मुंबई सेंट्रल, नागपाडा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साध्या वेशात सापळा रचत पोलिसांनी शमी, आदिल आणि अहमद यां तिघांना ताब्यात घेतले. हे तिन्ही आरोपी मुळचे उत्तर प्रदेशच्या मेरठचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : लोकल ट्रेनमध्ये नशेखोर तरुणांच्या हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू

Hingoli News : निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवला; महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राचार्यावर गुन्हा दाखल

Raashii Khanna : क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती हो...

SRH vs RR, IPL 2024: हैदराबाद- राजस्थानमध्ये कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

Parbhani News : विहिरीचे खोदकाम जेसीबीने; रोहयोच्या संतप्त मजुरांनी पंचायत समितीतच प्राशन केले किटक नाशक

SCROLL FOR NEXT