Pune news Saam
मुंबई/पुणे

Pune News: इन्स्पेक्टरच्या खुर्चीत ऐटीत बसला, पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो लिक; पण फोटो व्हायरल झालाच कसा? याच्या तपासावर भर

Pune Police Commissioner Orders Inquiry into Viral Photo: इन्स्पेक्टरच्या खुर्चीत बसून पोलिस ठाण्याचा 'अर्थ'पूर्ण कारभार पाहणाऱ्या 'त्या' पोलिस महाशयावर कारवाई करण्याऐवजी, त्याचा 'तो' फोटो लिक झाला कसा? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील बाणेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये जात त्यांच्या खुर्चीवर बसून काही फोटो काढले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी चौकशी आदेश काढले होते. मात्र, इन्स्पेक्टरच्या खुर्चीत बसून पोलिस ठाण्याचा 'अर्थ'पूर्ण कारभार पाहणाऱ्या 'त्या' पोलिस महाशयावर कारवाई करण्याऐवजी, त्याचा 'तो' फोटो लिक झाला कसा? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, यासाठी पोलिस ठाण्याचे पथक कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चार दिवसांपूर्वी साम टीव्हीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. पोलीस पाडाळे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाडाळे पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये जातात, नंतर निरीक्षकांच्या खुर्चीवर बसून फोटोशूट करतात. या बाबतचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

परंतु, याप्रकरणी कुणावरही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण पाडाळे यांना जाब विचारण्याचे सोडून हा सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो कुणी व्हायरल केले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी पोलिस ठाण्याचे पथक कामाला लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एकीकडे ६४ वसुलीवाल्यांना पोलिस आयुक्तांनी गणवेश परिधान करून रस्त्यावर उभे केले होते. असे असताना या वजनदार कर्मचाऱ्यावर मात्र कोणतेच कारवाई होताना दिसून येत नाही आहे. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याला कुणाचा पाठिंबा आहे का? या घटनेबाबत अद्याप कारवाई झालेली का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साई मंदिरात पारंपारिक पद्धतीने लक्ष्मी कुबेर पूजन

Boondi Ladoo Recipe: या भाऊबीजनिमित्त भावाला द्या खास मिठाई; झटपट बनवा हॉटेल स्टाईल बूंदीचे लाडू

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

SCROLL FOR NEXT