मुंबई: खोट्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीच्या लोकांच्या चौकशी सध्या सुरू आहेत. तेव्हा भाजपच्या (BJP) प्रमुख लोकांना गुदगुल्या होत आहेत. आता राज्यात पोलीस (Police) एखाद्या गुन्ह्या प्रकरणी भाजपच्या नेत्यांची चौकशी करायला सुरवात करतात. तेव्हा त्यांनी त्याला सामोरे जावे, रस्त्यावर उतरून नौटंकी कशाला करत आहात, असा खोचक टोला शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत भाजपला लगावला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) पोलीस कधी देखील खोटे पुरावे दाखल करणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
हे देखील पहा-
राज्यामध्ये (state) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्या विरोधामध्ये मुंबई बँक घोटाळ्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्याविरोधामध्ये भाजपने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे की, केंद्रीय महाविकास आघाडीच्या लोकांच्या चौकशी सुरू होत असते, अटकेची कारवाई होते. तेव्हा भाजपच्या लोकांना गुदगुल्या होत असतात.
त्यावेळी भाजपचे लोक रस्त्यावर उतरून लेझीम खेळायचे बाकी असतात. आता मात्र, त्यांच्याविरोधामध्ये राज्यात पोलिसांनी चौकशी सुरू केली तर आरडा- ओरड सुरू केली असल्याचे राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत, हे माजी मुख्यमंत्री (CM) आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या माध्यमामधून त्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात पोलीस खोटे गुन्हे दाखल करणार नाहीत.
महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे. पुराव्यांशिवाय कारवाई करणार नाही असे देखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे. राज्यात तपास यंत्रणांनी एखाद्या गुन्ह्याविषयी चौकशी सुरू केल्यावर भाजपने आरडा- ओरड सुरू केला आहे. रडताय कशाला, मला का बोलावले, मला का बोलावले असे बोलून नौटंकी करण्यापेक्षा चौकशीला सामोरे जा असे आवाहन देखील संजय राऊत यांनी यावेळी केले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.