औरंगाबाद: औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर (Vaijapur) येथील शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याअगोदर त्यांच्या विरोधामध्ये महिलेला मारहाण (Beating) केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या पुरवणी जबाबावर विनयभंगाचे कलम लावण्यात आले आहे. भाजपच्या (BJP) कार्यक्रमाला गेल्याचा राग मनामध्ये धरून आमदार रमेश बोरणारे आणि इतरांनी एका महिलेस शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये हा प्रकार घडला होता. (Aurangabad Increase difficulty Shiv Sena MLA)
मात्र, पोलिसांनी (police) राजकीय दबावाखाली विनयभंगाचे कलम लावले नसल्याचा आरोप (Allegations) होत होत आहे. यामुळे पोलिसांवर टीका केली जात आहे. अखेर पुरवणी जबाबानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे आता आमदार (MLA) रमेश बोरणारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील पहा-
काय आहे प्रकरण?
संबंधित महिला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमाला गेले होते. यामुळे रमेश बोरणारे रमेश त्यांची पत्नी भाऊ आणि इतर नातेवाईकांना त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये सांगितले जात आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी रमेश बोरणारे यांच्याबरोबरच ९ जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाराच्या पीए यांनी भांडण सोडत असताना आपल्या जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून महिलेविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणांवर भाजपची टीका
मारहाणीच्या प्रकरणानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली? असे म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. त्यांच्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.