Anil Ambani Wife Tina Ambani Saam Tv
मुंबई/पुणे

Tina Ambani ED Enquiry: अनिल अंबानी यांच्यानंतर पत्नी टीना यांची ईडीकडून चौकशी, FEMA प्रकरणात गुन्हा दाखल

Priya More

Enforcement Directorate: देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या पत्नी टीना अंबानी (Tina Ambani) या आज मुंबईतील अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या. परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा (FEMA) प्रकरणात त्यांची देखील ईडीने चौकशी केली. सोमवारीच अनिल अंबानी यांचा ईडीने जबाब नोंदवण्यात होता. त्यानंतर आज टीना अंबानी यांचा जबाब नोंदवला गेला.

रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे परकीय चलन कायद्याच्या कथित उल्लंघनाच्या चौकशीसंदर्भात सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. 64 वर्षीय अनिल अंबानी हे बॅलार्ड इस्टेट भागातील फेडरल एजन्सीच्या कार्यालयात फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट अर्थात फेमाच्या विविध कलमांतर्गत नोंदवलेल्या खटल्यात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी ईडी समोर हजर झाले होते, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

2020 च्या येस बँकेच्या कर्ज प्रकरणात बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनिल अंबानी यापूर्वी 2020 मध्ये ईडीसमोर हजर झाले होते. आता पुन्हा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार सोमवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले होते. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई हाय कोर्टाने 420 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अनिल अंबानींना दिलासा दिला होता. तसेच कोर्टाकडून आयकर विभागाला अनिल अंबानींवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे सांगण्यात आले होते.

अनिल अंबानी यांच्यावर आरोप आहे की, 2007 च्या सुमारास त्यांच्या कंपन्यांनी एफडीआयच्या माध्यमातून भरपूर पैसा आणला होता. अंबानी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी परदेशात कर्जाच्या माध्यमातून पैसा उभा केला आणि एफडीआयच्या माध्यमातून भारतात आणल्याचा आरोप आहे. 2015 मध्ये हा पैसा परदेशात पाठवून कर्ज फेडल्याचे दाखविण्यात आले. ही रक्कम दोन हजार कोटींची असू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हा पैसा कर्जाच्या स्वरूपात किंवा एफडीआयच्या रूपाने भारतात आला आहे का? याचा तपास ईडी करत आहे. यासोबतच अनिल अंबानींकडे परदेशात पैसा आहे का? याचाही तपास ईडी करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT