Mumbai Lifeline Google
मुंबई/पुणे

Mumbai Lifeline: चार लाकडी डबे असलेली मुंबईची लाइफलाइन कशी झाली? लोकलचा १०० वर्षांचा इतिहास वाचा

Mumbai Local History: ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबईच्या रेल्वे मार्गावर पहिली विद्युत रेल्वे धावली, ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक ऐतिहासिक टप्पा गाठला. या घटनेमुळे मुंबई आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णमहोत्सवी दिन झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईच्या रेल्वे मार्गांवर ०३ फेब्रुवारी १९२५ रोजी एक ऐतिहासिक घटना घडली. ज्याने भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा टप्पा गाठला. याच दिवशी भारतात पहिली विद्युत रेल्वे धावली. ज्यामुळे मुंबई आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णमहोत्सवी दिन ठरला. शतकापूर्वी सुरू झालेल्या या परिवर्तनकारी प्रवासाने भारतीय रेल्वेचे स्वरूप बदलले आणि त्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस) ते कुर्ला मार्गावर धावलेली पहिली विद्युत लोकल ०३ फेब्रुवारी १९२५ रोजी भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. आज ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी या ऐतिहासिक घटनेस शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या शतकभरात भारतीय रेल्वेच्या वाहतुकीचं स्वरूप पूर्णपणे बदलले आहे आणि पर्यावरणपूरकतेसाठी नवी दिशा मिळाली आहे.

१९२५ च्या दशकात मुंबई शहर औद्योगिकदृष्ट्या प्रगती करीत होते, पण वाफेवर चालणाऱ्या इंजिनांमुळे रेल्वे प्रणाली प्रदूषण वाढवणारी आणि मंदगतीनं धावणारी ठरत होती. शहराच्या वाढती लोकसंख्या आणि प्रवासाच्या ताणाला तोंड देण्यासाठी, ब्रिटिश कालीन ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीनं मुंबई उपनगरीय रेल्वेचे विद्युतीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. १९२५ मध्ये सुरू झालेल्या या विद्युतीकरणाच्या प्रवासाने आज १०० वर्षे पूर्ण केली आहेत. भारतीय रेल्वेने शतकभरात केवळ प्रवासाचं साधनच नव्हे, तर देशाच्या विकासाचा मजबूत कणा बनला आहे, तसेच पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने एक आदर्श ठरला आहे.

चार डब्यांची लोकल आज १५ डब्यांची आणि एसी लोकल बनली आहे, जी मुंबईकरांच्या किफायतशीर आणि वेगवान प्रवासासाठी प्रमुख पसंतीची आहे. यामुळे लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते, कारण मुंबईकर रोज किमान तीन ते चार तास लोकलच्या प्रवासात घालवतात. भारतीय रेल्वेने शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष्य ठेवले असून, २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले. २०१५ मध्ये २५,००० व्होल्ट एसी आणि १५०० व्होल्ट डीसीचा वीजबचतीचा टप्पा पूर्ण झाला. आता हायड्रोजन उर्जेवर धावणाऱ्या इंजिनाची निर्मिती करण्याचे नियोजन आहे, ज्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मुंबईत जलद आणि कार्यक्षम प्रवासाची गरज निर्माण झाली, जेव्हा देशभरातून कारागीर मुंबईत येत होते. त्यासाठी इंग्रज सरकारने इलेक्ट्रिक रेल्वेचा प्रस्ताव मांडला. जर्मनीत १८७९ मध्ये इलेक्ट्रिक रेल्वेची पहिली सुरुवात झाली होती, आणि भारतात ४६ वर्षांनंतर हा बदल घडला. मुंबईने इलेक्ट्रिक रेल्वेचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर दक्षिण आणि पूर्व भारतातही विद्युतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. १९३१ मध्ये मद्रास (चेन्नई) ते तांबरम मार्गाचे विद्युतीकरण झाले, आणि १९४७ मध्ये भारतातील ३८८ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले. १९५७ मध्ये पूर्व भारतातील पहिला इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग सुरू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT