"Indira Gandhi kept my father in jail for 2 years and aunt in jail for 18 months," Said Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

"इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना २ वर्ष, काकूंना १८ महिने जेलमध्ये ठेवलं" - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis In Assembly Session: इंदिरा गांधीनाी माझ्या वडिलांना २ वर्षे आणि काकूंना अठरा महिने तुरुंगात ठेवले. त्यामुळे आम्ही जेल घाबरत नाही असंही फडणवीस म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई:

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय (Bugdet Session 2022) अधिवेशनात पेन सरकारवर माजी मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांना मोक्का लावण्याच्या कटाचा आरोप करत पुरावा म्हणून पेन ड्राईव्हमध्ये (Pen Drive) १२५ तासाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द केलं होतं. यानंतर फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्य सरकारने नोटीस पाठवून पेनड्राईव्ह प्रकरणाचं उत्तर मागितलं होत. याबाबत सभागृहात बोलताना फडणवीसांनी राज्य सरकारला सणसणीत उत्तर दिलयं, तसेच "इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) माझ्या वडिलांना २ वर्ष, काकूंना १८ महिने जेलमध्ये ठेवलं, आम्ही जेलला घाबरणारे लोकं नाहीत, आम्ही लोकांसाठी लढणारे लाेकं आहोत" असं फडणवीस म्हणाले.

हे देखील पहा -

फडणवीस आपल्या उत्तरात म्हणाले की, मला प्रश्नावली पाठवल्यानंतर मी कळवलं होतं की, मी उत्तर देईन, मात्र प्रश्नावली मधले प्रश्न आणि कालचे प्रश्न फरक यांच्यात फरक आहे. काल प्रश्न विचारले ते आरोपी करता होते असा आरोप फडणवीसांनी केला आहे. तसेच यावेळी फडणवीसांनी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नही वाचून दाखवला. "ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचा भंग केलं असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्न फडणवीसांना विचारला गेला होता. यावर फडणीसांनी आरोप केला की, जाणीवपूर्वक कोणीतरी प्रश्नावली बदलली, त्यांची मला नावंही माहित आहेत. या व्यक्तीला (फडणवीसांना) सह आरोपी करता येते का असे प्रयत्न होते असाही आरोप त्यांनी केला.

तसेच मी या ठिकाणी व्हिसल ब्लोअर अॅक्टनुसार (whistleblower act) वागलो असून मी transcript पण केंद्रीय गृह सचिवांना दिली अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. याबाबत कालचे प्रश्न पाहिल्यावर ह्याला राजकीय वळण आहे, प्रश्न कुठे बदलले, कोणी बदलले हे आपल्याला माहित आहे असा दावा त्यांना केला. शेवटी ते म्हणाले की, इंदिरा गांधीनाी माझ्या वडिलांना २ वर्षे आणि काकूंना अठरा महिने तुरुंगात ठेवले. त्यामुळे आम्ही जेल घाबरत नाही असंही फडणवीस म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT