रश्मी पुराणिक -
मुंबई: वस्त्रोद्योग पॉवरलुम, वीज बिल सबसिडी यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मंत्र्यांना घरचा आहेर दिलाय. आमदजार प्रणिती शिंदे यांनी याप्रकरणी प्रश्न उपस्थित करत ऊर्जा मंत्री नितीन राऊत, वस्त्रउद्योग मंत्री अस्लम शेख यांची कोंडी केली. यावेळी विरोधकही आक्रमक झालेले पाहायला मिळाले (Praniti Shinde Questioned Mahavikas Aghadi Ministers Over Textile Powerloom Electricity Bill Subsidy).
वस्त्रोद्योग पॉवरलुम (Textile Power loom), वीज बिल सबसिडी (Electricity Bill Subsidy) यावरुन महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनीच ऊर्जा मंत्री नितीन राऊत, वस्त्रउद्योग मंत्री अस्लम शेख यांची कोंडी केली. आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात नितीन राऊत (Nitin Raut) यांनी तात्काळ बैठक आश्वासन दिले आहे.
तर, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर टीका केली. टेक्स्टाईल मिलचा विचार करता, मग शेती वीज कनेक्शन तोडली जाते, यावर सरकार गंभीर का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अनिल परब (Anil Parab) यांनी अधिवेशन कालावधीत बैठक बोलवून निर्णय घेऊ, असे सांगितले.
गिरीश महाजन (Girish Mahajan) यासह भाजपा आमदार यावेळी आक्रमक झाले होते. पण, प्रणिती शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केल्याने महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची कोंडी झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
Edited By - Nupur Uppal
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.