Indian Railway Ashwini Vaishnaw  Saam tv
मुंबई/पुणे

Railway : रेल्वे प्रवासातील गर्दीचा ताण कमी होणार, २०३० पर्यंत ४८ प्रमुख शहरांमध्ये क्षमता दुप्पट करणार; काय म्हणाले रेल्वे मंत्री? वाचा

Indian Railway Ashwini Vaishnaw News : भारतीय रेल्वे २०२३० पर्यंत देशभरातील ४८ प्रमुख शहरांमध्ये रेल्वेची क्षमता दुप्पट करण्याची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. केंद्री रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे.

Alisha Khedekar

  • भारतीय रेल्वे २०३० पर्यंत ४८ प्रमुख शहरांमध्ये क्षमता दुप्पट करणार

  • रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट

  • दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे, बेंगळुरूसह अनेक शहरांचा समावेश

  • पुण्यात हडपसर, खडकी व आळंदी येथे रेल्वे अपग्रेडेशनसाठी योजना राबवली जाणार

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी तसेच रेल्वेवरचा भार कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने २०३० पर्यंत ४८ प्रमुख शहरांमध्ये रेल्वेची क्षमता दुप्पट करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे उद्दिष्ट देशव्यापी कनेक्टिव्हिटी मजबूत करणे आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, आम्ही वाढत्या प्रवाशांच्या मागणीला तोंड देण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी विविध शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहोत आणि विभागीय ऑपरेशनल क्षमता वाढवत आहोत. या उपक्रमामुळे आमचे रेल्वे नेटवर्क अपग्रेड होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.

गेल्या काही वर्षांत प्रवाशांनी रेल्वेतून मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे. ज्यामुळे रेल्वे नेटवर्कवर प्रचंड ताण येत आहे. अनेक प्रमुख शहर टर्मिनल्स आधीच त्यांच्या कमाल क्षमतेच्या जवळपास कार्यरत आहेत, ज्यामुळे भविष्यातील वाढीला सामावून घेणे कठीण झाले आहे. मोठ्या स्थानकांवरील गर्दीमुळे वेळेवर आणि एकूण कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे वाहतुकीतील अपेक्षित वाढ हाताळण्यासाठी विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. भारतीय रेल्वेने यावर भर दिला आहे की, भविष्यात प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करणे आवश्यक आहे.

रेल्वेची क्षमता दुप्पट करण्यासाठी ४८ शहरांची निवड

दिल्ली, मुंबई (मध्य आणि पश्चिम रेल्वे), कोलकाता (पूर्व, दक्षिण पूर्व आणि मेट्रो), चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, पाटणा, पुरी, लखनौ, पुणे, नागपूर, वाराणसी, कानपूर, गोरखपूर, मथुरा, अयोध्या, आग्रा, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, चंडीगढ, लुधियाना, अमृत जंक्शन, लुधियाना, बंगळुरू, बंगळुरू जोधपूर, जयपूर, वडोदरा, सूरत, मडगाव, कोची, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा, तिरुपती, हरिद्वार, गुवाहाटी, भागलपूर, मुझफ्फरपूर, दरभंगा, गया, म्हैसूर, कोईम्बतूर, टाटानगर, रांची, रायपूर, बरेली.

रेल्वेच्या सिंगल हबवरील ताण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रमुख टर्मिनल्सभोवती स्थानके विकसित करेल. उदाहरणार्थ, पुण्यात, हडपसर, खडकी आणि आळंदी येथे अपग्रेडेशनची योजना आहे, तसेच पुणे स्थानकावर अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि स्टेबलिंग लाईन्सची योजना आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे २०३० पर्यंत रेल्वे वरील गर्दीचा ताण कमी होऊन प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नॅपकीन फिरवत मंत्री भरत गोगावले यांनी विरोधकांना डिवचले

Crime: भाजप नेत्याकडून बायकोची हत्या, अनैतिक संबंधाचा संशय; किचनमध्येच चाकूने सपासप वार

Hair Care: केस नॅचरली हेल्दी आणि शायनी हवेत? मग सुट्टीच्या दिवशी 'हा' घरी बनवलेला हेअर मास्क नक्की लावा

Maharashtra Politics: मराठी महापौरच झाला पाहिजे, परप्रांतीय महापौर केला तर उग्र आंदोलन; कुणी दिला इशारा?

Wednesday Horoscope: राजकारण्यांसाठी उत्तम दिवस, काहींना महत्वाच्या कामात अडथळे, ४ राशींची चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT