Goutam Adani News saam tv
मुंबई/पुणे

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट होणार; अदानी करणार धारावीचा विकास

जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा लवकरच कायापालट होणार आहे

Vishal Gangurde

Goutam Adani News : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा लवकरच कायापालट होणार आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपनीने धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचं कंत्राट घेतला आहे. त्यामुळे लवकरच धारावीचा चेहरामोहरा बदलणार आहे. (Latest Marathi News)

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा (Dharavi) विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे धारावीच्या विकास करण्यासाठी गौतम अदानी यांची कंपनी पुढे सरसावली आहे. धारावीच्या पुनर्विकास करण्याचं कंत्राट अदानी ग्रुपला मिळालं आहे. हा प्रकल्प ५,०६९ कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार कुटुंबांना घरे मिळणार आहे. तर १२०० हून अधिक व्यावसायिक कार्यालयाचा सामावेश आहे.

'द हिंदू' या वृत्तपत्राने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एसवीआर श्रीनिवास यांच्या माहिती दिल्यानंतर हे वृत्त समोर आले आहे. या प्रकल्पासाठी अनेक कंपन्यांनी बोली लावली होती. यावेळी सर्वाधिक बोली ही अदानी ग्रुपने लावली. त्यामुळे या प्रकल्पाचं कंत्राट अदानी ग्रुपला मिळालं. या प्रकल्पासाठी डीएलएफ ग्रुपने २,०२५ कोटी रुपयांची बोली लावली होती.

१८ वर्षात चौथ्यांदा पुनर्विकासाचा प्रयत्न

धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न हा १८ वर्षातून चार वेळा करण्यात आला. राज्य सराकर अनेक वर्षांपासून आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुनर्विकास झाला नाही. आता धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास गौतम अदानी यांची कंपनी यशस्वी होणार का, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT