Thackeray Vs Thckeray : आजारपणावरून ठाकरे बंधूंमध्ये जुंपली; उद्धव ठाकरेंच्या मिमिक्रीवर राज ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून खिल्ली उडवल्यानंतर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात जुंपली आहे.
aaditya thackeray, uddhav thackeray and raj thackeray
aaditya thackeray, uddhav thackeray and raj thackeraysaam tv
Published On

Aaditya Thackeray News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून खिल्ली उडवल्यानंतर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात जुंपली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून केलेल्या टीकेवर आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या टीकेमुळे वाईट वाटल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मिमिक्रीवर राज ठाकरे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News )

aaditya thackeray, uddhav thackeray and raj thackeray
Narayan Rane : संजय राऊतांना विचारा जेलमध्ये कशी हवा असते ? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून टीका केली होती. तसेच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची भरसभेत खिल्ली उडवली होती. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, 'या विषयावर मला काहीच बोलायचं नाही. परिवार म्हणून आमचं दु:ख आणि वेदना आहेत, त्याच्यावर भाष्य न केलेलं बरं आहे. कारण त्याच्यातून माझे संस्कार दिसून येतील. त्यांना बोलायचं असेल, तर जाऊ द्या. पण त्यांचं बोलणं ऐकून दु:ख झालं आहे'.

aaditya thackeray, uddhav thackeray and raj thackeray
Raj Thackeray : मनसे मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार; राज ठाकरे यांनी केली घोषणा

आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या नक्कलीवर कोल्हापुरात पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरे म्हणाले, तो प्रश्न मिमिक्रीचा नव्हता. उद्देश काय होता? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावर असताना कोणाला भेटत नव्हते. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं का? लोक सांगत होते, आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे. त्यावेळी भेटत नव्हते. आता काही प्रॉब्लेम नाही. सगळं व्यवस्थित आहे का? आरोग्यात सुधारणा व्हावीच'.

'तेव्हा भेटी टाळत होते, पण आता बरोबर सगळं सुरळीत आहे. दौरै सुरू झाले. तेव्हा लोकांना भेटला का नाही? कोविडचं कारण सांगितलं, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com