वंदे भारत स्लीपर ट्रेन डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.
बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा ऑगस्ट २०२७ मध्ये सूरत–वापी यादरम्यान धावण्याची शक्यता.
मुंबई–अहमदाबाद मार्गावरील ५०८ किमी अंतर बुलेट ट्रेन दोन तासांत पूर्ण करणार.
Mumbai–Ahmedabad bullet train project timeline 2025–2029 : देशातील पहिली वंदे भारत ट्रेन पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये धावणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुंबई आणि अहमदाबाद यादरम्यान ५०८ किमी मार्गावर दशातील पहिली बुलेट ट्रेन २०९ मध्ये धावणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी बुलेट ट्रेन धावणार का? याबाबत अश्विनी वैष्णव यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. दरम्यान, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होऊ शकतो. सूरत ते वापी यादरम्यान बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये धावण्याची शक्यता आहे.
२०२९ पर्यंत देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट १०० टक्के सुरू होणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ऑगस्ट २०२७ मध्ये सूरत ते वापी या १०० किमी मार्गावर पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावणार आहे. याआधी सूरत ते बिलिमोरा यादरम्यान ५० किमीवर पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावणार होती. पण आता सूरत ते वापी, या १०० किमीवर बुलेट ट्रेन पहिल्या टप्प्यात धावणार असल्याचे समोर आले आहे.
मुंबई ते अहमदाबाद या ५०८ किमी मार्गावर बुलेट ट्रेन ३२० प्रति तास वेगाने धावेल, असे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर ४ स्थानकावर थांबली तर ५०८ किमीचे अंतर दोन तासात पूर्ण होणार आहे. जर सर्व १२ स्थानकावर बुलेट ट्रेनला थांबा दिला तर मुंबई-अहमदाबाद हे अंतर २ तास १७ मिनिटांचा वेळ लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी बुलेट ट्रेनच्या सूरत स्थानकाची पाहणी केली होती. यााबबत रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरत स्थानकावरील काम पाहून खूश झाले आहेत.
देशातील पहिले वंदे भारत स्लीपर कधी सुरू होईल? याबाबतही रेल्वे मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले की, पुढील महिन्यापासून स्लीपर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करेल. रेल्वे अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, वंदे भारत स्लीपरच्या पहिल्या ट्रेनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याच्या जागा पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी बनवण्यात आल्या आहेत आणि प्रवासादरम्यान लोकांना थोडासा धक्काही जाणवत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.