India's 76th Independence Day LIVE Saam Tv
मुंबई/पुणे

India's 76th Independence Day LIVE : नव्या संकल्पाने नव्या दिशेने वाटचाल करण्याचा हा दिवस : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत आज ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत.

साम वृत्तसंथा

नव्या संकल्पाने नव्या दिशेने वाटचाल करण्याचा हा दिवस आहे: पंतप्रधान मोदी

'आझादी का अमृत महोत्सवा' दरम्यान आम्हाला आमच्या अनेक राष्ट्रीय वीरांची आठवण झाली. १४ ऑगस्टला फाळणीची भीषणता आठवली. गेल्या ७५ वर्षांत आपल्या देशाला पुढे नेण्यात योगदान देणाऱ्या देशातील त्या सर्व नागरिकांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. कर्तव्याच्या मार्गावर बलिदान देणाऱ्या बापू, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांचे नागरिक कृतज्ञ आहेत. कर्तव्याचा मार्ग हाच त्यांचा जीवनमार्ग होता, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

७६ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला

76 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला.

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली

नवी दिल्ली : भारत आज ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. पीएम मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची ही सलग ९वी वेळ असेल. हे वर्ष भारतासाठी खूप खास आहे आणि संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत म्हणून साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम राजघाटावर पोहोचून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण केला. यानंतर ते लाल किल्ल्यावर पोहोचतील आणि तिरंगा फडकवून कार्यक्रमाला सुरुवात करतील. यानंतर सकाळी साडेसात वाजता त्यांचे भाषण सुरू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT