Bachchu Kadu News
Bachchu Kadu News Saam TV
मुंबई/पुणे

'शिंदे गटासोबत पहिले गेलेले मागे राहिले अन्...'; मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: जवळपास महिनाभरापासून रखडलेला शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर पार पडला आहे. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी ९ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर (Deepak Kesarkar) शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

मात्र, सत्तास्थापन करण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भक्कम साथ देणारे आमदार बच्चू कडू यांना मात्र आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात सहभाग नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या याच चर्चांवरती बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पाहा व्हिडीओ -

साम टीव्हीशी बोलताना ते म्हणाले, 'मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या अपक्ष आमदारांना मंत्री पद मिळणे अपेक्षित होते. आम्ही अडचणी समजू शकतो. जे आमदार सोबत गेले त्यांची नाराजी तर असणारच. जे एकनाथ शिंदे गटासोबत पहिले गेले ते मागे राहिले आणि मागून आलेले पुढे गेले असं म्हणत बच्चू कडू यांनी भावना व्यक्त केल्या.

तसंच मला एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे. पुढच्या विस्तारात ते शब्द पाळतील मला विश्वास आहे. माझ्या मनात नाराजी नाही पण, कार्यकर्त्यांच्या मनात पहिल्या टप्प्यात मंत्रीपद मिळावं ही अपेक्षा होती. मी आता मंत्री नाही एक अधिवेशन मला आमदार म्हणून मिळणार आहे. त्यावेळी सामान्यांचे प्रश्न मी अधिवेशनात मांडणार असल्याचंही ते म्हणाले.

नाराज अपक्ष पाहण्यात नाही -

तर कोणताही अपक्ष आमदार नाराज आहे असं माझ्या पाहण्यात आलं नाही. बच्चू कडू यांना देखील पुढील वेळी मिळेल कि आणि ते नाराज नसल्याचं वक्तव्य अपक्ष आमदार किशोर झोडगेवार यांनी केलं आहे.

कोणीही नाराज नाही - केसरकर

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जे मंत्री होते त्यांना पहिले या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं अशी इच्छा होती त्या अनुषंगाने मंत्रीपद मिळाला आहे. त्यामुळे कोणीही नाराज नाही. जे मंत्रीपद मला मिळेल त्या मंत्रीपदाचा कारभार मी चांगल्या पद्धतीने हाताळेल असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

Health Tips: जेवणानंतर तुम्हालाही आहे का चहा पिण्याची सवय? त्याआधी हे वाचाच

Relationship Tips : तुम्हीही लग्नासाठी उतावळे झालात; कमी वयात विवाह करण्याचे तोटे माहितीयेत का?

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

SCROLL FOR NEXT