Ravi Rana vs Bacchu Kadu Saam TV
मुंबई/पुणे

Rana vs Kadu : बच्चू कडू-रवी राणांमधील वाद मिटला? वर्षा बंगल्यावर मध्यरात्री काय घडलं?

या वादावर तोडगा काढण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत दोघांनाही वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी बोलावलं होतं.

साम टिव्ही ब्युरो

Rana vs Kadu : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवासांपासून वाद सुरू आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढाकार घेत दोघांनाही वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यासोबत चर्चा केली. मात्र अद्यापही या वादावर तोडगा निघाला नसून वाद कायम असल्याची माहिती आहे. (Bacchu Kadu News Today)

गुवाहटीला जाऊन कडू यांनी ५० खोके घेतल्याचा आरोप रवी राणा (Ravi Rana)  यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) प्रचंड आक्रमक झाले. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की आमदार रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावे, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी मोठा खुलासा करणार असल्याची घोषणाही कडू यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० खोके कुणी घेतले याबाबत खुलासा करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. इतकंच नाही तर, माझ्यासोबत १२ आमदार असल्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिला. दरम्यान, हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालल्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर मध्यस्थी केली.

मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी बोलावलं. शिंदेंनी रविवारी रात्री दोघांसोबतही तब्बल अडीच तास चर्चा केली. पण त्यामध्ये कोणताच ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. दरम्यान, आज रवी राणा आणि बच्चू कडू हे ‘सागर’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT