Independent MLA will support BJP in Maharashtra Legislative Council elections? Saam Tv
मुंबई/पुणे

Legislative Council Elections 2022: अपक्ष आमदारांची साथ मविआला की भाजपला?

Legislative Council Elections 2022 : मुख्यमंत्री भेटत नाहीत त्यात जाहीरपणे संजय राऊत टीका करत असल्याने आपण नाराज झाल्याचे काही अपक्ष आमदारांनी खासगीत बोलताना सांगितले आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला जोरदार धक्का दिल्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला (MVA) जोरदार धक्का देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. महाविकास आघाडी सरकारवर अपक्ष आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याचाच फायदा घेत भाजपकडून मविआला पुन्हा झटका देण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी मविआला मतदान न केल्याने शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले होते. त्यानंतर आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक (Legislative Council Elections 2022) होत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मविआ सरकारचा प्रयत्न होता, पण १० ते शक्य झालं नाही. आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. अशात अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अपक्ष आमदारांची मविआ सरकारवर असलेली नाराजी आणि संजय राऊतांनी अपक्ष आमदारांबाबत केलेलं वक्तव्य यामुळे अपक्ष आमदार भाजपसोबत (BJP) जात मविआ सरकारला पुन्हा झटका देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं ही निवडणूक चुरशीची झाली आहे. यात भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन अर्ज कायम असल्यानं १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं भरलेला तिसरा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गर्जे यांनी डमी अर्ज दाखल केला होता. विधानपरिषद निवडणुकीत आता भाजपचे ५, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचे २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील.

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर अपक्ष आमदारांमध्ये वाढली नाराजी

राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. या पराभवाचं खापर संयज राऊत यांनी अपक्ष आमदारांवर फोडलं होत. यावेळी राऊतांनी अपक्ष आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अपक्ष आमदार नाराज आहेत. राऊत अपक्ष आमरांबाबत म्हणाले होते की, अपक्ष आमदार घोडे आहेत, हरभरे टाकू तिकडे ते जातात. तुम्ही फार हरभऱ्याच्या झाड चढवू नका. हरभरे काही अपक्षांनी खाल्ले आहेत असं राऊत म्हणाले होते. तसेच ज्याने कुणी शब्द देऊनही दगाबाजी केली आहे, त्याची यादी आमच्याकडे आहे. त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहिती आहे कुणी आम्हाला मत दिलं नाही असं म्हणत त्यांना अप्रत्यक्षपणे अपक्ष आमदारांना धारेवर धरलं होतं त्यामुळे अपक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती.

घोडेबाजार शब्दावर अपक्ष आमदाराचा आक्षेप

राज्यसभा निवडणूकीच्या मतदानापुर्वी 'घोडेबाजार' या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Prashant Jorgewar) यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. घोडेबाजार' हा शब्द नेत्यांकडून वारंवार वापरला गेल्यास अपक्ष आमदारांना "वेगळा विचार करावा लागेल", असा इशाराही त्यांनी दिला होता. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणे चूक-महापाप असून, घोडेबाजार हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब होते, असे किशोर जोरगेवार यांनी म्हटलं होतं याबाबत मुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील जोरगेवार यांनी दिली. शिवसेनेचे काही नेतेही या शब्दाचा वारंवार उल्लेख करीत आहेत यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आमदार देवेंद्र भुयार यांची जाहिरपणे नाराजी

राऊतांच्या वक्तव्याबाबत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले होते की, "मी विश्वास मताच्या वेळेलाही महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती संजय राऊत यांचा चुकतंय, ते खूप मोठे नेते आहे मात्र असा आरोप करणे योग्य नाही. शिवसेनेचं नियोजन चुकलं, शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केलेला नाही. प्रामाणिकपणे मतदान करूनही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे. त्यामुळे आमच्या बद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच अपक्षांना एकत्रित येऊन एक भूमिका घ्यावी लागेल. विचार करावा लागेल, हा एकट्या अपक्षावर दाखवलेला अविश्वास नाही तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे" असं म्हणत भुयार यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

नाराज आमदार भाजपच्या संपर्कात?

अपक्ष आमदारांना मविआ सरकार निधी देत नाही असा सूर अपक्ष आमदारांचा आहे. यात काही मविआमधीलही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या ऐन दिवशीच आपली नाराजी जाहीर केली होती. "आमच्याकडे दुर्लक्ष झालं" अशी खदखद मोहितेंनी व्यक्त केली होती. त्यामुळे असे अनेक नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आधीच मुख्यमंत्री भेटत नाहीत त्यात जाहीरपणे संजय राऊत टीका करत असल्याने आपण नाराज झाल्याचे काही अपक्ष आमदारांनी खासगीत बोलताना सांगितले आहे. तसेच मविआला साथ देऊन जर अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल तर परिषदेच्या निवडणुकीत वेगळा विचार करायला हरकत नसल्याचे देखील काही अपक्ष आमदार खासगीत बोलत आहेत त्यामुळे येत्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष आमदार भाजपसोबत जाणार की, मविआ सरकारला पाठिंबा देणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : मविआ ही कोविडच्या काळात मलिदा खाणारी गॅंग; फडणवीस यांची घणाघाती टीका | Marathi News

Maharashtra News Live Updates: भाजप उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Chhagan bhujbal : ऐन विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा जुंपली

Manoj Jarange News : आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा; जरांगेंचा नाव न घेता भुजबळांवर फटकेबाजी

12th Student Suspended : युट्यूबवर पाहून बॉम्ब बनविला आणि थेट शिक्षकाच्या खुर्चीखाली केला विस्फोट, बारावीतल्या विद्यार्थ्यांचा कारनामा

SCROLL FOR NEXT