अक्षय बडवे, प्रतिनिधी...
Pune Pimpari Chinchwad News: पुणे आणि पिंपरी चिंचवड काही दिवसांपासून डेंग्यूची साथ (Dengue) वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे महापालिका हद्दीत 24 जुलैपर्यंत डेंग्यूचे 33 पॉझिटिव्ह आणि 621 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) डेंग्यू आणि चिकुनगुनियाशी संबंधित रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
याचा प्रसार रोखण्यासाठी सध्या महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार, महापालिकेच्या हद्दीत २४ जुलैपर्यंत डेंग्यूचे ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ६२१ संशयित रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.
डेंग्यूप्रमाणेच चिकनगुनियाच्या तीन प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती महापालिकेच्या साथरोग विभागाने दिली आहे. रोगांचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेप्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच ज्या ठिकाणी डासांची उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली, तेथे 1 लाख 38 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
डेंग्यूचा लक्षणे...
अनेकदा डेंग्यूचा संसर्ग होऊनही सौम्य लक्षणे अथवा अजिबात लक्षणे दिसून येत नाही. संसर्ग झाल्यानंतर ती ४ ते १० दिवसांत लक्षणे दिसून येतात. प्रमुख लक्षणांमध्ये उच्च ताप (१०४ फॅरनहिट), तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, स्नायू व सांधेदुखी, चक्कर, मळमळ, ग्रंथींना सूज, त्वचेवर चट्टे यांचा समावेश आहे.
अशी घ्या काळजी...
१. डेंग्यूचा डास दिवसा सक्रिय असल्याने दिवसभर काळजी घ्यावी. २. तुमच्या परिसरात डासप्रतिबंधक औषधांचा वापर करा तसेच परिसरात स्वच्छता ठेवा . ३. डास घरात येऊ नयेत घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवून घ्या. ४. शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे परिधान करावेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.